MOTN 2024: 6 महिन्यात महाराष्ट्राचा असा बदलला मूड, MVA साठी गुड न्यूज, BJP साठी...

मुंबई तक

08 Feb 2024 (अपडेटेड: 08 Feb 2024, 06:03 PM)

Mood of the Nation 2024 : मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला नेमक्या किती जागा मिळतील हे पाहायला मिळेल. पण सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या जनतेचा नेमका काय मूड होता हेही आपण पाहूयात.

मूड ऑफ द नेशन

Mood of the nation Maharashtra

follow google news

Mood of the Nation 2024 and Aug 2023: मुंबई: लोकसभा 2024 निवडणुकीआधी देशाचा नेमका मूड काय आहे हे India Today आणि मुंबई Tak ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मूड ऑफ द नेशन या सर्व्हेनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. मात्र, त्याआधी या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा काय मूड आहे हे आपण जाणून घेऊया. (mood of the nation 2024 this is how mood of maharashtra has changed in 6 months good news for mva big blow to bjp)

हे वाचलं का?

2019 विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही पूर्णपणे बदलून गेली आहे. त्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधून फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण हे अधिकच वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. मात्र, या सगळ्यानंतरही महायुतीसाठी लोकसभेची निवडणूक सोप्पी नाहीए. 

मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार, भाजपसह महायुतीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये 41 जागा जिंकणाऱ्या महायुतीला यंदाच्या निवडणुकीत मात्र, 22 जागाच मिळतील असं सर्व्हेमधून दिसत आहे. म्हणजे तब्बल 19 जागांचा फटका महायुतीला बसताना दिसतोय. तर महायुती तब्बल 26 जागांवर विजय मिळवेल असा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आला आहे. 

मात्र, साधारण सहा महिन्यांपूर्वीच India Today ने देशाचा मूड जाणून घेतला होता. तेव्हा  महाराष्ट्रातील जनतेचा नेमका मूड काय होता आणि आता मूड आहे हे आपण जाणून घेऊया. 

ऑगस्ट 2023 मध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा काय होता मूड?

किती Vote Share?

ऑगस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व्हेमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) म्हणजेच महायुतीला 40 टक्के मतदान होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. 

तर ऑगस्ट 2023 च्या सर्व्हेनुसार, काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि शरद पवार गट यांच्या मतांची टक्केवारी (Vote Share)ही 45 टक्के एवढी होती. 

दरम्यान, आता करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार, (जानेवारी 2024) महायुती आणि महाविकास आघाडी यांचा मतांची टक्केवारी (Vote Share) ही अनुक्रमे 40.50 टक्के आणि 44.50 टक्के एवढा आहे. म्हणजेच सहा महिन्यांमध्ये मतांच्या टक्केवारीत अर्धा टक्का बदल झालेला आहे. 

महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व्हेनुसार, महायुतीला महाराष्ट्रात 48 पैकी केवळ 20 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. म्हणजेच इथे भाजपसह युतीला मोठा फटका बसताना दिसत होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 28 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. 

आता सहा महिन्यानंतर जो सर्व्हे (जानेवारी 2024) घेण्यात आला आहे त्यात महाविकास आघाडीची काहीशी पिछेहाट झाल्याचं दिसत आहे. ऑगस्टमध्ये महायुतीला म्हणजे काँग्रेससह शिवसेना (UBT) आणि शरद पवार गटाला 26 जागा मिळणार असल्याचं दिसतं आहे. म्हणजेच मागील सहा महिन्यात महाविकास आघाडीच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. 

मूड ऑफ द नेशन (2024) महायुतीच्या जागा वाढल्या, पण...

ऑगस्ट 2023 च्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून 5 जागा महाराष्ट्रात मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर भाजप 15 जागा मिळतील असा अंदाज होता. 

तर जानेवारी 2024 च्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून 6 जागा तर भाजपला 16 जागा मिळतील असा अंदाज आहे.  म्हणजेच आताच्या सर्व्हेनुसार महायुतीच्या दोन जागा वाढत आहेत. मात्र, तरीही 2019 च्या तुलनेत अद्यापही महायुतीला 15 जागांचा फटका बसू शकतो.

मूड ऑफ द नेशन (2024) महाविकास आघाडीचा जोर कायम...

ऑगस्ट 2023 च्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार शिवसेना (UBT) आणि शरद पवार गट यांना मिळून 18 जागा महाराष्ट्रात मिळतील असा अंदाज होता. तर काँग्रेसला 10 जागा मिळतील असा अंदाज होता. 

तर जानेवारी 2024 च्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार 
शिवसेना (UBT) आणि शरद पवार गटाला मिळून 14 जागा तर काँग्रेसला 12 जागा मिळतील असा अंदाज आहे.  म्हणजेच आताच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीच्या दोन जागा कमी होत आहेत. मात्र, तरीही महायुतीला आणि प्रामुख्याने भाजपला महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरदार झटका देण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp