“राऊतांची तीन इंद्रियं निकामी, ऑपरेशन आम्हीच करू”, अजित पवार गटाचा पलटवार

मुंबई तक

14 Jan 2024 (अपडेटेड: 14 Jan 2024, 04:12 PM)

खासदार संजय राऊत यांनी आमदार अपात्रतेवरून अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. त्यांनी टीका करताच अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरींनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.

MP Sanjay Raut criticized Ajit Pawar MLA Amol Mithkari criticism

MP Sanjay Raut criticized Ajit Pawar MLA Amol Mithkari criticism

follow google news

Sanjay Raut : आमदार अपात्रतेचा (MLA disqualification) निकाल लागल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी बंडखोर करणाऱ्या नेत्यांवर टीका केली होती. त्यानंतरही राऊतांनी एकनाथ शिंदेंसह अजित पवारांचे (DCM Ajit Pawar) नाव न घेता त्यांनी त्यांना टोला लगावला होता. बंडखोरी आणि पक्ष फोडणाऱ्यांवर टीका करताना ते म्हणाले होते की, कोणी बापाचा पक्ष चोरलाय तर कोणी काकाचा पक्ष चोरलाय म्हणत त्यांनी टीका केली होती. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mithkari) यांनी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांची तिन्हीही इंद्रिये निकामी झाल्याचे सांगत त्यांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याची गरज असल्याचा खोचक टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

हे वाचलं का?

तिन्हीही इंद्रिये निकामी

खासदार संजय राऊत यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय लागल्यानंतर त्यांनी शिंदे गटावर आणि अजित पवार गटावर टीका केली होती. त्यावरूनच अकोल्यातील मेळाव्यात बोलताना अमोल मिटकरींनी त्यांचा समाचार घेतला आहे. संजय राऊतांची मेंदू, जीभ आणि डोळे ही तिन्हीही इंद्रिये निकाला झाल्याचे सांगत त्यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.

हे ही वाचा >> Milind Deora : ‘हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है!’, CM शिंदेंनी कुणाला दिला इशारा

राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर आता अमोल मिटकरींनी अजित पवारांचे राष्ट्रीय अध्यक्ष असं नाव घेत शरद पवार गटालाच डिवचल्याचेही यावेळी दिसून आले. सगळा पक्ष अजित पवारांकडे असल्याचे सांगत त्यांनी अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जीवाची पर्वा नाही

अमोल मिटकरी यांनी यावेळी संजय राऊत यांच्यासह त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. कोरोनाच्या काळातील दाखला देत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त ते दोनदाच मंत्रालयात गेले होते, मात्र त्या काळात अजित पवारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी मंत्रालयातून काम करत राहिले असंही त्यांनी यावेळी सांगितले.

…तेच धोरण असेल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यांचे कौतुक करत त्यांच्या कामामुळे तरुणही त्यांच्याकडे आशेने पाहतात असं वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे समर्थन करत त्यांनी आमचा नेता जे सांगेल तेच धोरण आणि आमचा नेता जो बांधेल तेच तोरण आणि हीच आमची भूमिका असेल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

    follow whatsapp