Amol Kolhe: ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’, अमोल कोल्हेंनी लोकसभा दणाणून सोडली!

रोहित गोळे

10 Aug 2023 (अपडेटेड: 10 Aug 2023, 01:35 PM)

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाहा अमोल कोल्हे नेमके काय म्हणाले.

ncp mp amol kolhe strongly criticized the modi government said is the governments head in place in the lok sabha political news headlines today

ncp mp amol kolhe strongly criticized the modi government said is the governments head in place in the lok sabha political news headlines today

follow google news

No-Confidence Motion: नवी दिल्ली: मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) मुद्द्यावरून लोकसभेत मोदी सरकारविरोधात (Modi Government) विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव (No-Confidence Motion) आणला. याचवेळी चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अवघ्या अडीच मिनिटात मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी लोकमान टिळकांच्या इंग्रज सरकारवर केलेल्या टीकेचा पुनरुच्चार करत मोदी सरकारला थेट सवाल विचारला की, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? (ncp mp amol kolhe strongly criticized the modi government said is the governments head in place in the lok sabha political news headlines today)

हे वाचलं का?

अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात मोदी सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचं म्हणत जोरदार हल्ला चढवला. लोकसभेतील चर्चेदरम्यान अमोल कोल्हे यांच्या वाटेला अवघी अडीच मिनिटं आली. मात्र, या अडीच मिनिटात देखील अमोल कोल्हेंनी सरकार अतिशय तिखट आणि बोचऱ्या शब्दात टीका केली.

हे ही वाचा>> Congress: तुम्हाला माहितेय राहुल गांधींनी लोकसभेत नेमके कोणते पोस्टर दाखवले?

पाहा अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले…

‘मी सरकारविरोधात आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ बोलत आहे. सरकारच्या या कार्यपद्धतीकडे पाहून मला गांधीजींच्या तीन माकडांची आठवण येते. सरकारच्या विरोधात काहीही ऐकू नका, निवडणुका सोडून देशाची काय परिस्थिती आहे ते नका पाहू.. आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची बोलती बंद करा..’

‘या सरकारवर नेमका कसा विश्वास ठेवायचा? जे सरकार महागाईवर बोलत नाही, जे सरकार आर्थिक वाढीचे आकडे तर फेकतात पण दरडोई उत्पन्नावर मात्र बोलत नाहीत.’

‘गृहमंत्र्यांनी काल खूप योग्य वक्तव्य केलं की, आकडे कधी खोटं बोलत नाही. यामुळे अर्थव्यवस्था जेव्हा पाचव्या क्रमांकावर पोहचते तेव्हा दरडोई उत्पन्नात देश 141 व्या क्रमांकावर आहे. तर काय देशाची संपत्ती ही निवडक लोकांच्याच हातात जात आहे?’

‘या सरकारने अनेक भाषणांमध्ये शेतकरी सन्मान निधीबाबत वक्तव्य केलं. पण खते आणि बियाणांच्या किंमती चार ते पाच पटीने वाढ झाली.. याबाबत ते बोलले नाही.’

‘आता अर्थमंत्री बोलत होत्या तेव्हा त्यांनी टॉमेटोच्या बाबतीत हस्तक्षेपाबद्दल भाष्य केलं. पण मागील चार-पाच वर्षांपासून आमचे शेतकरी टॉमेटो रस्त्यावर फेकत होते तेव्हा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे सरकार गेलं नाही. तीच अवस्था आज कांद्यांच्या किंमतीबाबत आहे.’

‘पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त माझ्या मतदारसंघातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने पंतप्रधानांना चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. याचं कारण आपले चुकीचे निर्यात धोरण आहे.’

’63 मून्स टेक्नॉलॉजीसारखी कंपनी 13 हजार गुंतवणूकदारांचं नुकसान करते. 5600 कोटींचा घोटाळा करते पण तरीही महाराष्ट्राचं सरकार एमपीआयडी कायद्यातंर्गत त्यांच्यावर कारवाई करत नाही.. हे कोणाच्या इशाऱ्यावरून सुरू आहे?’

‘यामुळेच.. जे सामान्यांचं सरकार नाहीए.. अशा सरकारवर आम्हाला विश्वास नाहीए. त्यामुळे मी अविश्वास प्रस्तावाचं समर्थन करतो.’

‘नुकतंच पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. पण त्याचबरोबर मी ही गोष्टही लक्षात आणून देतो इच्छितो की.. लोकमान्य टिळकांच्या एका वाक्याबाबत… सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? हे आत्मचिंतन व्हायला हवं.’ असं म्हणत अमोल कोल्हेंनी पंतप्रधान मोदींसह भाजप सरकारवर टीका केली.

    follow whatsapp