राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू, कारला समोरुन येणाऱ्या वाहनाने दिली धडक

NCP women regional vice president geetatai hinge death in Gadchiroli Accident News : राजकारणाबरोबरच सामाजिक उपक्रमांतही गीताताई हिंगे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्या ‘आधार विश्व फाउंडेशन’च्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या आणि या संस्थेमार्फत अनेक गरीब व गरजू कुटुंबांना मदत केली

NCP women regional vice president geetatai hinge death in Gadchiroli Accident News

NCP women regional vice president geetatai hinge death in Gadchiroli Accident News

मुंबई तक

08 Dec 2025 (अपडेटेड: 08 Dec 2025, 11:10 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू

point

कारला समोरुन येणाऱ्या वाहनाने दिली धडक

NCP women regional vice president geetatai hinge death in Gadchiroli Accident News : गडचिरोली जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीताताई हिंगे (Geetatai Hinge) यांचा पाचगाव परिसरात झालेल्या गंभीर अपघातात मृत्यू झाला. रविवारी उशिराच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात दु:ख व्यक्त केले जात आहे.

हे वाचलं का?

नागपूरवरून परतताना भीषण अपघात

रविवारी खासगी कारणासाठी गीताताई हिंगे नागपूरला गेल्या होत्या. रात्री उशिरा गडचिरोलीकडे परतत असताना पाचगावजवळ त्यांच्या चारचाकीला समोरून येणाऱ्या वाहनाने जोरात धडक दिली. धडक एवढी गंभीर होती की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पतींना किरकोळ दुखापती झाल्या असून, स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. पोलीस पथकाने घटनास्थळी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा : कोल्हापूर : कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल

अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

गीताताई हिंगे पूर्वी भाजपमध्ये अत्यंत सक्रिय पदाधिकारी म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी भाजपच्या जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा महामंत्री अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. 26 नोव्हेंबर 2025 रोजी त्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये दाखल झाल्या आणि प्रवेशानंतर लगेचच त्यांची महिला प्रदेश उपाध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या आगमनाने पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

सामाजिक कार्यातही त्यांनी बजावला मोठा वाटा

राजकारणाबरोबरच सामाजिक उपक्रमांतही गीताताई हिंगे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्या ‘आधार विश्व फाउंडेशन’च्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या आणि या संस्थेमार्फत अनेक गरीब व गरजू कुटुंबांना मदत केली. विशेषत: कोरोना काळात त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अन्नधान्य, औषधे आणि अन्य आवश्यक साहित्य गरजूंना पोहोचवले. त्यांच्या कामाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली होती.

गडचिरोलीमध्ये हळहळ

गीताताई हिंगे यांच्या अचानक निधनाने गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जनसंपर्कात सहजता, लोकाभिमुख कामांचा ध्यास आणि समाजकार्यातील समर्पित वृत्तीमुळे त्या जिल्ह्यात लोकप्रिय होत्या. त्यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेत्यांनी दु:ख व्यक्त करत शोक व्यक्त केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जय पवारांच्या लग्नाला सुप्रिया सुळेंची दांडी, भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनासोबत थिरकल्या, Video व्हायरल

    follow whatsapp