Operation Sindoor : नवी दिल्ली: काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात काही निष्पाप पर्यटकांचा खात्मा करण्यात आला होता. या प्रत्युत्तरात आता भारतानं 7 मे 2025 रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात एकूण 9 ठिकाणांवर हल्ला केला. या हल्लात भारतीय महिला शक्तीचं मोठं योगदान आहे. ज्यात सोफिया कुरैशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा यात समावेश आहे.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर या दोन्ही महिला अधिकाऱ्यांची चर्चा सुरूय. या हल्ल्यानंतर लष्करातील दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानावर झालेल्या हल्ल्यावर भाष्य केलंय. या झालेल्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका पेलणाऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंह कोण आहेत? हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.
हेही वाचा : "आम्ही झोपेत असताना 4 ड्रोन आले आणि सगळंच...", एअर स्ट्राईक्स पाहिलं, तो पाकिस्तानी काय म्हणाला?
कोण आहेत विंग कमांडर व्योमिका सिंह?
विंग कमांडर व्योमिका सिंह या 18 डिसेंबर 2004 मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाल्या. सध्याच्या काळातील इतर सर्वोत्तम विंग कमांडरपैकी त्या एक आहेत. ज्यांना लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्याचा त्यांना अनुभव आहे. चित्ता आणि चेतकसारख्या लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. वायुसेनेत सामील झाल्यानंतर 13 वर्षांनंतर व्योमिका सिंह यांना विंग कमांडर पद मिळालं आणि 18 डिसेंबर 2017 रोजी त्यांची विंग कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
हेही वाचा : जगाला 'ऑपरेशन सिंदूर' कसं घडलं हे सांगणारी कर्नल सोफिया कुरैशी आहे तरी कोण?
विंग कमांडर व्योमिका सिंह जेव्हा इयत्ता सहावीत होत्या तेव्हा त्यांनी हवाई दलात जाण्याचं स्वप्न बाळगलं होतं. त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर हातांच्या बोटांवर मोजण्याइतक्या मुली लष्करी सैन्यात कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांनी युपीएससी परिक्षेत पास होत हवाई दलात प्रवेश केला आणि नंतर त्या हेलिकॉप्टर पायलट म्हणून कार्यरत झाल्या होत्या.
त्या लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्यासोबतच 2021 मध्ये मणरिंग पर्वतावर चढाई करणाऱ्या हवाई दलाच्या महिला शाखेचा भाग होत्या. यामध्येही त्यांनी आपला इतिहास रचला आहे.
ADVERTISEMENT
