संतोष पंडितांना कायद्याच्या कचाट्यात अडकवलं की अडकले? पडद्यामागची इनसाईड स्टोरी...

मुंबई तक

• 11:04 AM • 05 Sep 2026

पुण्यातील सोशल मीडिया क्रिएटर संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडीओमधील कथित आक्षेपार्ह मजकुराच्या तक्रारीवरून ही कारवाई झाल्याचे वृत्त आहे.

Santosh Pandit

Santosh Pandit

Google CTA

बातम्या हायलाइट

point

संतोष पंडित यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवलं की अडकले?

point

पडद्यामागची इनसाईड स्टोरी

Santosh Pandit : प्रसिद्ध युट्युबर संतोष पंडित यांना पोलिसांनी नुकतीच पुण्यातून मध्यरात्री अटक केली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि एका नगरसेविकेविषयी आक्षेपार्ह हातवारे व बदनामीकारक वक्तव्ये केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एरंडवणे भागातील एका ओपन जिमच्या खर्चावरून त्यांनी केलेल्या विविध विकासकामांच्या स्टिंग ऑपरेशन्स आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाड्यांवरील नंबर प्लेटच्या प्रश्नांनंतर हा वाद चव्हाट्यावर आला होता. प्रशासनाने या जिमचा खर्च 9 लाख 8 हजार रुपये असल्याचे स्पष्ट केले असले, तरी संतोष पंडितांनी यापूर्वी विचारलेल्या प्रश्नांमुळे सत्ताधारी नेत्यांमध्ये रोष निर्माण झाला होता.

हे वाचलं का?

प्रश्न विचारणाऱ्यांनाच अटक 

या प्रकरणामध्ये संतोष पंडितांनी भाषेच्या आणि देहबोलीच्या मर्यादा पाळायला हव्या होत्या यात दुमत नाही, मात्र प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना किंवा पत्रकारांना अशा प्रकारे मध्यरात्री अटक करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. नियमभंग करणाऱ्या आमदार-खासदार किंवा इतर व्हीआयपी व्यक्तींवर कारवाई का होत नाही, आणि संतोष पंडितांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्यांवर पोलिसांनी कायदेशीर बडगा का उगारला नाही, असे प्रश्न विरोधकांकडून व सर्वसामान्य नागरिकांकडून विचारले जात आहेत.

हे ही वाचा : Maharashtra Weather : पावसाचा पुन्हा ब्रेक, पुन्हा एकदा राज्यावर संकट? IMD अपडेट

सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणाऱ्यांना भीती

सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी या कारवाईचा निषेध करत, हा नागरिकांचा आवाज दाबण्याचा आणि दडपशाहीचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. पुण्यात डीजेमुक्त उत्सवाची मागणी करणाऱ्या विद्यानंद बापट यांना झालेली मारहाण आणि संतोष पंडितांवर झालेली कारवाई, या दोन्ही घटनांमधून सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणाऱ्यांना भीती दाखवण्याचा संदेश दिला जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हे ही वाचा : हार्मोनल असंतुलन अन् नैराश्य..., महिलेने पोटच्या 4 महिन्यांच्या जुळ्या मुलींसोबत काय केलं?

...तर नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात येईल

लोकशाहीत सत्तेला आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून, यामुळेच लोकशाही मजबूत होते. मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडून जर अशा दडपशाहीविरोधात हजारो बापट आणि पंडित एकत्र उभे राहिले नाहीत, तर नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात येईल, असा इशारा या संपूर्ण घटनेच्या निमित्ताने दिला जात आहे.