जुन्नर : परिसरात बिबट्याचा वावर, खेळायला गेलेली मुलं येईनात; आई टेन्शनमध्ये, शेवटी व्हायचं तेच झालं

Pune News, Junnar News : जुन्नरमध्ये परिसरात बिबट्याचा वावर, खेळायला गेलेली मुलं येईनात; आई टेन्शनमध्ये, शेवटी व्हायचं तेच झालं

Pune News

Pune News

मुंबई तक

23 Nov 2025 (अपडेटेड: 23 Nov 2025, 12:44 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जुन्नर : परिसरात बिबट्याचा वावर, खेळायला गेलेली मुलं येईनात;

point

आई टेन्शनमध्ये, शेवटी व्हायचं तेच झालं

जुन्नर, पुणे : इदगाह मैदानाजवळील शेततळ्यात शनिवारी दोन सख्या भावंडांचा पाण्यात बुडून झालेल्या मृत्यूची हृदयद्रावक घटना घडली. आफान अफसर इनामदार (वय 10) आणि रिफत अफसर इनामदार (वय 7, रा. इस्लामपुरा, खडकवस्ती, जुन्नर) अशी मृत मुलांची नावे असून, संपूर्ण परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

खेळायला गेलेली मुलं परतलीच नाहीत

अधिकची माहिती अशी की, खेळायला गेलेली मुलं परतलीच नाहीत. शनिवारी दुपारी चार वाजेपासून ही दोन्ही मुले घरी दिसत नसल्याचे आईच्या लक्षात येताच तिने तात्काळ जुन्नर पोलिसांत तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. मुलं नेहमी खेळायला जाणाऱ्या भागात तपास सुरू असताना, त्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळाल्याने वनविभागालाही पाचारण करण्यात आले. पोलिस पथक, वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिकांच्या मदतीने ड्रोनच्या सहाय्याने शोधकार्य वेगाने सुरू करण्यात आले.

शोधादरम्यान शेततळ्याच्या काठावर लहान मुलांचे बूट आणि चप्पल पडलेली पाहून संशय बळावला. तळ्यात तपास सुरू केला असता साडेनऊच्या सुमारास दोन्ही भावंडांचे मृतदेह पाण्यात आढळून आले. तातडीने त्यांना बाहेर काढण्यात आले आणि जुन्नर रेस्क्यू टीमच्या ॲम्ब्युलन्समधून शिवछत्रपती रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जाहिद हसन यांनी तपासणी करून, मुलांचा सुमारे चार तासांपूर्वीच बुडून मृत्यू झाल्याचे पुष्टी केली.

हेही वाचा : मुंबई: 76 वर्षीय आईला बेन स्ट्रोक, डॉक्टरांकडे नेलं, पण बिलाची रक्कम ऐकून रुग्णालयाकडे फिरकलाच नाही, शेवटी...

घटनेची माहिती समजताच रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिस निरीक्षक किरण अवचर, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण तसेच संबंधित विभागातील कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून शोधमोहीमेत सहभागी झाले होते.

इनामदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर

या भावंडांच्या मृत्यूने इनामदार कुटुंब पूर्णपणे कोसळले आहे. मुलांचे वडील पाच महिन्यांपूर्वी नोकरीसाठी दुबईला गेले असून, त्यांच्या अनुपस्थितीत मुलांची जबाबदारी आई आणि आजीकडे होती. दुपारी खेळायला गेलेली मुले अचानक बेपत्ता होणे आणि त्यानंतर दोघांचेही मृतदेह तळ्यात सापडणे, हा अत्यंत हृदयद्रावक प्रसंग असल्याचे नातेवाईक सांगतात. आफान हा तिसरीत तर रिफत ही पहिलीत शिकत होती. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पैठण : बापाचा खून करुन मृतदेह घरात पुरला,भोळसर आईला धमकी देऊन गप्प केलं, 8 दिवसांनी उग्र वास अन्..

    follow whatsapp