Pune tehsildar suryakant yewale suspension : "कोरेगाव पार्क येथील 1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी केली. स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये देऊन अमेडिया कंपनीच्या नावावर करण्यात आली , असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर केला होता. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जमीन व्यवहार प्रकरणात पुण्यातील तहसीलदाराचे निलंबन करण्यात आल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली, असा आरोप दानवेंनी केला होता. त्यानंतर या प्रकरणात पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शिवाय जमीन खरेदीतील व्यवहाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अंजली दमानिया यांचे आरोप
अंजली दमानिया म्हणाल्या, Amadea Holdings LLP ही केवळ पार्थ पवार यांचीच कंपनी आहे. दिग्विजय पाटील हे नाममात्र पार्टनर आहेत. 1,00,000 च्या भांडवलात, 99000 हे पार्थ पवार यांचे आहेत (99%), आणि 1000 हे दिग्विजय पाटलांचे आहेत (1%). ह्याला सगळा नफा देखील पार्थ पवारांच मिळत होता. ह्या कंपनी मध्ये 31/09/2025 पर्यंत ह्या कंपनीत पैसे देखील नव्हते. इंटीरियर ची कामे घेणारी कंपनी आहे. ह्या कंपनीत पार्थ पवार यांना मिळणारा पगार देखील ५२ लाख आहे तर दिग्विजय यांचा पगार फक्त 53,000 आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











