संजय राऊत भडकले, राजाभाऊ वाजेंच्या अश्रू तरळले, पत्रकार परिषदेत काय घडलं?

rajabhau waje emotional : 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांमुळे ठाकरे गटात खळबळ उडाली असताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी भावूक होत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी संजय राऊत यांनीही संभाव्य बंडखोरांवर जोरदार टीका केली.

rajabhau waje emotional

rajabhau waje emotional

मुंबई तक

17 Jun 2026 (अपडेटेड: 17 Jun 2026, 02:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संजय राऊत भडकले

point

राजाभाऊ वाजेंच्या अश्रू तरळले

point

पत्रकार परिषदेत काय घडलं?

rajabhau waje emotional : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा चांगलीच रंगली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या आणि ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या संभाव्य बंडखोरीच्या चर्चेत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचेही नाव घेतले जात होते. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राजाभाऊ वाजे यांनी अत्यंत भावूक होत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळलेले दिसले, तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी संभाव्य बंडखोरांवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला.

हे वाचलं का?

हेही वाचा : चंद्रपूर : आधी आईचा जळून मृत्यू, नंतर चिमुरडा नाल्यात बुडाला; एकाच दिवशी काय घडलं?

राजाभाऊ वाजेंच्या अश्रू तरळले

राजाभाऊ वाजे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. आपल्या निष्ठेबाबत कोणतीही शंका घेण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सूचित केले. 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील विश्वास व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणात विविध माध्यमांतून येणाऱ्या बातम्यांमुळे वातावरण तापले असले तरी आपण पक्ष सोडत असल्याचा कोणताही प्रश्न नसल्याचा संदेश त्यांनी दिला. त्यामुळे त्यांच्या नावाभोवती फिरणाऱ्या सर्व चर्चांना त्यांनी स्वतःच पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : Operation Tiger Live Updates : संजय राऊतांनी 'या' दोन खासदारांसह घेतली ओम बिर्लांची भेट, काय घडणार?

संजय राऊत आक्रमक, बंडखोरांना शिवीगाळ 

याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनीही अत्यंत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी कोणत्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे नाव न घेता बेईमानीवर टीका केली. काही लोकांमध्ये बेईमानी रक्तातच असल्यासारखे वाटत असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या विविध राजकीय घडामोडी, न्यायालयीन प्रक्रिया आणि पक्षाशी संबंधित प्रकरणांचा उल्लेख केला. शिवसेना पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाबाबतही त्यांनी भाष्य केले. तसेच या सर्व चर्चांबाबत पक्षातील कुणीही थेट आपल्याशी किंवा उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून काही सांगितलेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

राऊत यांनी 14 तारखेला झालेल्या बैठकीचाही उल्लेख केला. त्या बैठकीला अनेक खासदार उपस्थित होते आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेही संवाद झाला होता, असे त्यांनी सांगितले. त्या बैठकीत कोणत्याही खासदाराने पक्ष सोडत असल्याचे म्हटले नव्हते, असा दावा त्यांनी केला. माध्यमांमध्ये सहा खासदारांच्या बंडाची चर्चा होत असताना त्या सहा जणांची नावे किंवा चेहरे समोर आणावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. पक्षातील सर्व खासदार आजही आपल्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त करताना त्यांनी सावध राहण्याची गरज असल्याचे मान्य केले. संविधानातील तरतुदी, पक्षविलिनीकरणासंदर्भातील नियम आणि लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्राचाही त्यांनी उल्लेख केला. कुणीही प्रत्यक्ष समोर येऊन पक्ष सोडत असल्याचे सांगितलेले नसताना अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करत त्यांनी या चर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.