'जय जिनेंद्र अन् 230 कोटी..', मुरलीधर मोहोळांना बर्थडेच्या शुभेच्छा देण्यासाठी रवींद्र धंगेकरांचं ट्वीट, खोचक टोला

Ravindra Dhangekar on Muralidhar Mohol : 'जय जिनेंद्र अन् 230 कोटी..', मुरलीधर मोहोळांना बर्थडेच्या शुभेच्छा देण्यासाठी रवींद्र धंगेकरांचं ट्वीट, खोचक टोला

Ravindra Dhangekar on Muralidhar Mohol

Ravindra Dhangekar on Muralidhar Mohol

मुंबई तक

09 Nov 2025 (अपडेटेड: 09 Nov 2025, 12:54 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हॅपी बर्थडे बरं का...! वाढदिवसाच्या 230 कोटी शुभेच्छा..!

point

मुरलीधर मोहोळांना बर्थडेच्या शुभेच्छा देण्यासाठी रवींद्र धंगेकरांचं ट्वीट

Maharashtra Politics : केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी एक ‘खोचक’ ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या शुभेच्छा संदेशावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

हे वाचलं का?

रवींद्र धंगेकर यांनी आपल्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून मोहोळ यांना शुभेच्छा देत लिहिलं आहे की, "हॅपी बर्थडे बरं का...! वाढदिवसाच्या 230 कोटी शुभेच्छा..!" या ट्वीटमध्ये रवींद्र धंगेकरांनी “जय जिनेंद्र” असंही लिहिलं असून, याच वाक्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. धंगेकरांच्या या ‘230 कोटी’ उल्लेखाचा संदर्भ पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीच्या वादाशी जोडला जात असल्याचं पाहायला मिळतं. मुरलीधर मोहोळ यांनी या ट्वीटला अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, धंगेकरांच्या या खोचक शुभेच्छांमुळे पुन्हा एकदा पुण्याचं राजकारण तापलंय.

हेही वाचा : पत्नीचे दुसऱ्याच महिलेसोबत समलैंगिक संबंध! प्रेमसंबंधात आड येत असल्याने 5 महिन्यांच्या बाळाला संपवलं अन्...

पुण्यातील जैन बोर्डिंगच्या डीलवरुन मुरलीधर मोहोळांवर झाले होते आरोप

पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात चर्चेत आला होता.. रवींद्र धंगेकर यांनी या व्यवहारातील अनियमितता आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावरील सहभागाचा उघडा आरोप करत मंत्रिपदावरून पायऊतार होण्याची मागणी केली होती. दरम्यान, सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर गोखले बिल्डर यांच्याकडून हा व्यवहार रद्द करण्यात आला. शिवाय, या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. संबंधित बिल्डरसोबतच्या भागिदारीतून मी नोव्हेंबर 2024 मध्ये मी बाहेर पडलो होतो, असं स्पष्टीकरण मुरलीधर मोहोळ यांनी दिलं होतं.

दरम्यान, या प्रकरणामुळे मुरलीधर मोहोळ यांच्यावर चारीबाजूंनी टीका झाली होती. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : राज्यातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा

    follow whatsapp