राजन पाटलांच्या मुलाने अजितदादांना एकेरी भाषेत ललकारलं, आता रोहित पवार म्हणाले..,'अंगात मस्ती..'

Rohit Pawar on Balraje Patil : राजन पाटलांच्या मुलाने अजितदादांना एकेरी भाषेत ललकारलं, आता रोहित पवार म्हणाले..,'अंगात मस्ती..'

Rohit Pawar on Balraje Patil

Rohit Pawar on Balraje Patil

मुंबई तक

19 Nov 2025 (अपडेटेड: 19 Nov 2025, 10:49 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राजन पाटलांच्या मुलाने अजितदादांना एकेरी भाषेत ललकारलं

point

आता रोहित पवार म्हणाले..,'अंगात मस्ती..'

Rohit Pawar on Balraje Patil, सोलापूर : “अजितदादा कोणाचाही नाद करा, पण अनगरकरांना नाद करु नका", असा इशारा माजी आमदार राजन पाटील यांचे मोठे पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांनी दिला आहे. अनगर येथे झालेल्या जल्लोषादरम्यान त्यांनी केलेले हे वक्तव्य सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. अनगर नगरपंचायतीची निवडणूक यंदा राज्यात विशेष चर्चेत राहिली. अनेक वर्षे बिनविरोधाची परंपरा असलेल्या या निवडणुकीत प्रथमच आव्हान उभे राहिल्याने परिस्थितीत मोठा बदल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात जाऊन अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला होता. मात्र छाननीदरम्यान त्यांचा अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाला. त्यानंतर राजन पाटील यांच्या समर्थकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर उत्साहात आनंद व्यक्त केला. याच वेळी विक्रांत पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना एकेरी उद्देशून आव्हानात्मक वक्तव्य केल्याचे दिसले. दरम्यान, याबाबत आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते - रोहित पवार

रोहित पवार म्हणाले, आदरणीय राजन पाटील साहेब,आपण जेष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे, परंतु काल आपल्या चिरंजीवांचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटले. आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरोधात वापरली नाही. ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल. मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही, त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमाने घ्या. असो, भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि #महाराष्ट्र_धर्माचा विसर पडतोच! आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा..!

राष्ट्रवादीच्या उज्वला थिटे यांचा अर्ज बाद

ग्रामपंचायत नगरपंचायतीत उन्नती झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात होत्या. पाटील गटाला यावेळीही निवडणूक बिनविरोध पार पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्वला थिटे यांनी थेट अर्ज दाखल करून या परंपरेला खंडित केले. थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल केल्याची घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली. छाननीदरम्यान अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी घेतलेल्या आक्षेपांनंतर थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला. अर्ज बाद होताच पाटील समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. त्या जल्लोषात विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांनाही कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून उत्साह व्यक्त केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Inside स्टोरीः भाजपने नेते फोडले म्हणून शिंदेंचे मंत्री संतापले अन् CM कडे गेले.. फडणवीसांनी त्यांनाच झापलं! मंत्रालयात नेमकं...

    follow whatsapp