Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार जमीन घोटाळ्याने चर्चेत आला आहे. कोरेगाव पार्क येथील महार वतानाच्या 40 एकर जमीन घोटाळ्यावरून सध्या तपास सुरु आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी जमीन प्रकरण निवळल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत महायुतीने केलेल्या जमीन घोटाळ्याचा पाढा वाचला आहे. पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार गट असाच उल्लेख केल्याचं दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नांदेड हादरलं! 6 वर्षीय चिमुरडी शिकवणीहून घरी जाताना 22 वर्षीय नराधमाने केले लैंगिक अत्याचार, नागरिकांकडून फाशीची मागणी
त्यांनी आपल्या ट्विटमधून 'हे सर्व घोटाळे बघता शिवसेना शिंदे गट , भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कायदे - नियमांना धाब्यावर बसवून जमिनी लाटणारी “गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन” अशी नवी योजना सरकारमार्फत सुरू केलीय असेच म्हणावे लागेल. “करून वोटचोरी- करू जमिनीची लुटमारी” असे नवे ब्रीदवाक्य सरकारने ठेवायला हरकत नाही,' असं 'X' ट्विट त्यांनी केलं आहे.
रोहित पवारांचं ट्विट जसंच्या तसं....
“गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन” सरकारची नवी योजना
नवी मुंबईत शिंदे साहेबांचा गट – 5000 कोटीची सिडको जमीन
पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा –1800 कोटीची जैन बोर्डिंग जमीन
पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा- 500 कोटीची मोबोज हॉटेल कंपाऊंड इव्याकु प्रॉपर्टी ची जमीन
संभाजीनगरमध्ये शिंदे साहेबांचा गट – #MIDC ची राखीव जमीन
संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भाजपा –200 कोटीची अंजली टॉकीजची जमीन
पुण्यात अजित दादांचा गट – 300 कोटीची कोरेगाव पार्क जमीन
अहिल्यानगरमध्ये अजित दादांचा गट – जैन समाजाची जमीन
नवी मुंबई विमानतळाजवळ अवैध गौण खनिज उत्खनन घोटाळा - 3000 कोटी
मुंबईत देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा – SRA च्या हजारो कोटींच्या जमिनी
नाशिकमध्ये शिंदे साहेबांचा गट - त्र्यंबकेश्वर जमीन
मुंबईत देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा – भाजपा कार्यालयाची जमीन
हे सर्व घोटाळे बघता शिवसेना शिंदे गट , भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कायदे - नियमांना धाब्यावर बसवून जमिनी लाटणारी “गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन” अशी नवी योजना सरकारमार्फत सुरू केलीय असेच म्हणावे लागेल. “करून वोटचोरी- करू जमिनीची लुटमारी” असे नवे ब्रीदवाक्य सरकारने ठेवायला हरकत नाही.
भाजपशी संबंधित प्रकरणे आली की चौकशी आधीच क्लीन-चीट द्यायची आणि इतर दोन मित्रपक्षांची प्रकरणे असली की पॉलिटिकल स्कोर सेटल होईपर्यंत आणि पॉलिटिकल बार्गेनिंग होईपर्यंत चौकशीचा बनाव करायचा अशा प्रकाराची ‘आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे ते कार्ट’ ही भाजपची कार्यपद्धती दिसून येते.
हे ही वाचा : 'जय जिनेंद्र अन् 230 कोटी..', मुरलीधर मोहोळांना बर्थडेच्या शुभेच्छा देण्यासाठी रवींद्र धंगेकरांचं ट्वीट, खोचक टोला
परिणामी महाराष्ट्रात हे जे सर्व काही घोळ सुरू आहेत त्यासाठी सरकारचे प्रमुख म्हणून प्रामुख्याने मुख्यमंत्री जबाबदार असून आणि त्यांनी या सर्व घोळांची जबाबदारी घ्यावी. असो, मुख्यमंत्री या सर्वच प्रकरणांची कुठलाही भेदभाव न करता पारदर्शकपणे चौकशी करतील का? हे बघणं महत्वाचं ठरेल!, असं ट्विट केलं आहे.
ADVERTISEMENT











