Sharad Pawar Ajit Pawar : काका-पुतण्या एका फ्रेममध्ये, दिवाळी पाडव्याच्या रात्री बारामतीत काय घडलं?

प्रशांत गोमाणे

• 04:55 AM • 15 Nov 2023

शरद पवारांच्या गोविंद बागेतील पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार का? असा प्रश्न दिवसभर कार्यकर्त्यांना पडला होता. तब्येतीची कारणास्तव ते गैरहजर राहण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अखेर रात्री 8 वाजता अजित पवार गोविंद बागेत सहकुटुंब दाखल झाले.

sharad pawar ajit pawat meet govindbaug padawa celebraton supriya sule share photo bhaubeej

sharad pawar ajit pawat meet govindbaug padawa celebraton supriya sule share photo bhaubeej

follow google news

Sharad Pawar Ajit Pawar Meet Govind baug Padwa Celebration : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांच्या (Sharad Pawar) बारामतीतील गोविंद बागेत (Govind baug) मंगळवारी 14 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा (Diwali Padwa) उत्साहात साजरा झाला. गेल्या 53 वर्षापासून हा दिवाळी पाडवा साजरा होतोय. या पाडव्यानिमित्त शरद पवार राज्यभरातील कार्यकर्त्यांना भेटत असतात. एकीकडे गोविंद बागेत दिवसभर कार्यकर्त्यांची रीघ लागली असताना दुसरीकडे सर्वाधिक उत्सुकता ही अजित पवारांची (Ajit Pawar) होती. अजित पवार गोविंद बागेत हजेरी लावणार का? असा सवाल राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना पडला होता. मात्र अखेर रात्री 8 वाजता अजित पवार सहकुटुंब दाखल झाले.त्यामुळे दिवसभर सुरु असलेला सस्पेन्स अखेर संपला. (sharad pawar ajit pawat meet govindbaug padawa celebraton supriya sule share photo)

हे वाचलं का?

शरद पवारांच्या गोविंद बागेतील पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार का? असा प्रश्न दिवसभर कार्यकर्त्यांना पडला होता. तब्येतीची कारणास्तव ते गैरहजर राहण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अखेर रात्री 8 वाजता अजित पवार गोविंद बागेत सहकुटुंब दाखल झाले. यावेळी अजितदादांसोबत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारही स्नेहभोजनाला पोहोचले होते.शरद पवार यांच्या गोविंदबाग येथील निवासस्थानी अजितदादांचे संपूर्ण कुटुंब सुमारे 3 तास उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आता फोटोही समारे आले होते.

हे ही वाचा : Subrata Roy : सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या मृत्यूचे कारण काय?

एकाच फोटोत दादा-शरद पवार

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी गटाच्या सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबियांच्या गोविंद बागेतील दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शरद पवार आणि त्यांच्या पाठीमागे अजित पवार दिसत आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकाच फ्रेममध्ये दिसून आले आहेत.

दरम्यान याआधी 13 नोव्हेंबरला अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. या भेटीचे देखील सुप्रिया सुळे यांनी फोटो शेअर केले होते. या फोटोत अजित पवार कुठेच दिसले नव्हते. पण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार दिसल्या होत्या. तसेच 12 नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात देखील अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र दिसून आल्या होत्या. 10 नोव्हेंबरलाही प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी पवार कुटुंबाचं स्नेहभोजन पार पडलं होतं.

हे ही वाचा : रामदास कदमांनी घेतली शिंदेंची भेट, कीर्तिकरांबाबत मोठं विधान

आता पाडवा एकत्र साजरा केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी भाऊबीज करण्यासाठी जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp