विधानसभेच्या अध्यक्षपदाची संधी दिली, 40 वर्षांपासून सहकारी; पण तोच मातब्बर नेता शरद पवारांची साथ सोडणार

Arun Gujarathi leaves Sharad Pawar NCP :विधानसभेच्या अध्यक्षपदाची संधी दिली, 40 वर्षांपासून सहकारी; पण तोच मातब्बर नेता शरद पवारांची साथ सोडणार

Arun Gujarathi leaves Sharad Pawar NCP

Arun Gujarathi leaves Sharad Pawar NCP

मुंबई तक

11 Nov 2025 (अपडेटेड: 11 Nov 2025, 12:25 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मातब्बर नेत्याने शरद पवारांची साथ सोडली

point

उत्तर महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

Arun Gujarathi leaves Sharad Pawar NCP, मनीष जोग , जळगाव : उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आलीये. माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी लवकरच शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. याबाबत त्यांनी 'मुंबई Tak' शी बोलताना सविस्तर भाष्य केलंय. विशेष म्हणजे अरुण गुजराथी शरद पवारांचे गेल्या 40 वर्षांपासून विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. शिवाय त्यांना शरद पवारांनी अनेकदा मोठी जबाबदारी देखील दिली होती. मात्र, कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 

हे वाचलं का?

कार्यकर्ते म्हणाले तुम्ही येत असाल तर आम्ही जाऊ - गुजराथी 

अरुण गुजराथी म्हणाले, आपण सत्ताधारी पक्षात जावं, असं कार्यकर्त्यांचं मत आहे. काही कार्यकर्ते शिंदेसेनेत आणि भाजपमध्ये देखील गेले आहेत. 3-4 वर्ष सत्ता येणार नाही, विरोधी पक्षात इतके वर्ष कसे काढायचे? असं कार्यकर्ते म्हणाले आहेत. मी राजकारणातून हळूहळू निवृत्त होत असल्याचं शरद पवारांना सांगितलं होतं. मात्र, कार्यकर्ते म्हणतात आम्ही 50 वर्ष तुमच्यासोबत राहिलो आहोत. तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडत आहात. त्यामुळे मी सँडवीच झालो. कार्यकर्त्याचं काम मी करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत. मी धुळ झटकून काम करणार आहे. कार्यकर्ते म्हणाले तुम्ही येत असाल तर आम्ही जाऊ. मात्र, मला काही राजकारण करायचं नाही. मी चोपड्याच्या बाहेर जाणार नाही. मी 1985  ते 2025 असं 40 वर्ष शरद पवारांसोबत राहिलो आहे. 

परिस्थिती माणसाला गुलाम बनवते की काय असं देखील मला वाटतं - अरुण गुजराथी 

शरद पवारांनी जेवढं मला प्रेम दिलं तेवढ इतर कोणाला दिलं नसेल. माझी निष्ठा त्यांच्याशी आहे, संपर्क देखील आहे. त्यांच्यावर माझा दृढ विश्वास आहे, श्रद्धा देखील आहे. काही निर्णय परिस्थितीमुळे घ्यावे लागतात. परिस्थितीजन्य व्यवहार म्हणून हा निर्णय घ्यायचाय. मी साहेबांची भेट घेतलीये. मला त्यांना सोडल्याची खंत असणार आहे. आमच्यात कटुता राहू नये, यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. माझं अजित पवार यांच्याशी बोलणं झालेलं आहे. मी मुंबईत जाऊन पक्षप्रवेश होणार आहे. मी तिकडं जात असलो तर पवार साहेबांसोबत निष्ठा कायम आहे. परिस्थिती माणसाला गुलाम बनवते की काय असं देखील मला वाटतं. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

नातेवाईकाला स्टेशनवर सोडायला गेला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, दिल्ली कार स्फोटात बिहारच्या पंकजचा दुर्दैवी मृत्यू!

    follow whatsapp