शरद पवारांच्या मनधरणीसाठी देशातील ‘हे’ नेते सरसावले! काय घडलं?

मुंबई तक

05 May 2023 (अपडेटेड: 05 May 2023, 06:11 AM)

Sharad Pawar withdraw resignation : शरद पवार यांची मनधरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तर केलीच, त्याऐवजी देशातील अनेक बड्या नेत्यांनी देखील केली. आता हे नेते कोण आहेत? व त्यांनी शरद पवार यांना काय मागणी केली? हे जाणून घेऊयात.

sharad pawar withdraw resignation there big leader advised

sharad pawar withdraw resignation there big leader advised

follow google news

Sharad Pawar withdraw resignation : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षपदावर आज वाय.बी.सेंटरमध्ये होणाऱ्या अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. या बैठकीपूर्वीच शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी दिली होती. त्यामुळे शरद पवार अध्यक्षपदावर कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान शरद पवार यांची मनधरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तर केलीच, त्याऐवजी देशातील अनेक बड्या नेत्यांनी देखील केली. आता हे नेते कोण आहेत? व त्यांनी शरद पवार यांना काय मागणी केली? हे जाणून घेऊयात. (sharad pawar withdraw resignation there big leader advised to continue as the party president)

हे वाचलं का?

शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अगदी रडून राजीनामा मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र या सर्व प्रकरणात शरद पवार यांनी देशातील इतर बड्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय़ मागे घेण्यावर चर्चा करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार शरद पवार यांची राहूल गांधी,  द्रमुक मुन्नेत्र कळघम पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन, माकपचे नेते सिताराम येच्चूरी, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार या नेत्यांशी फोनवरून चर्चा झाली. या चर्चेत सर्वच नेत्यांनी शरद पवार यांना पक्षाचे अध्यक्षपदी कायम राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

हे ही वाचा : शरद पवारचं राहणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष! बैठकीआधी मोठी अपडेट समोर

आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणूकांभोवती राष्ट्रीय राजकारण केंद्रित असल्याने, शरद पवार यांनी अध्यक्ष पद सोडण्याच्या निर्णयावर पुर्नविचार करावा,असा सल्ला द्रमुक मुन्नेत्र कळघम पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांनी दिला.यासह शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेऊन,राष्ट्रवादीचे नेतृत्व करत रहावे,असे देखील एम के स्टॅलिन म्हणाले आहेत.

देशातील विरोधी पक्षांना एकत्र करण्यास पवारांसोबत मोलाची भूमिका बजावणाऱ्या माकप नेते सिताराम येंचूरी यांनी सुद्धा शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली होती.शरद पवार आणि सिताराम येंचूरी यांच्यात लोकसभा निवडणूकीवरून देखील चर्चा झाली. या चर्चेत निवडणूकीला 10 महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती आहे.

एम के स्टॅलिन, सिताराम येंचूरी यांच्यासह शरद पवार यांची केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन,समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार या सर्व नेत्यांशी चर्चा झाली होती.या चर्चेत शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याचा सल्ला देण्यात आला. या सल्ल्यानंतर आता शरद पवार काय निर्णय़ घेणार याकडे संपु्र्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.

    follow whatsapp