NCP : शरद पवारांचा ‘तो’ मोठा दावा प्रफुल पटेलांनी खोडून काढला, म्हणाले…

प्रशांत गोमाणे

05 Oct 2023 (अपडेटेड: 05 Oct 2023, 05:05 PM)

इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये प्रफुल पटेलांना प्रश्न करण्यात आला की, राष्ट्रवादीच्या 6-7 आमदार आणि खासदारांनी शरद पवारांकडे भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जर भाजपसोबत नाही गेलो तर ईडी आपल्याला जेलमध्ये टाकेल.

sharad pawar's big claim praful patel refuse india today conclave mumbai 2023

sharad pawar's big claim praful patel refuse india today conclave mumbai 2023

follow google news

India Today Conclave Mumbai Praful Patel : इंडिया टुडे कॉनक्लेव मुंबईच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 6-7 आमदार आणि खासदार यांनी माझ्याकडे येऊन भाजप सोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे म्हटले होते. शरद पवारांचा हा दावा आता अजित पवार गटाचे खासदार शरद पवार यांनी खोडून काढला आहे. (sharad pawar’s big claim praful patel refuse india today conclave mumbai 2023)

हे वाचलं का?

इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये प्रफुल पटेलांना प्रश्न करण्यात आला की, राष्ट्रवादीच्या 6-7 आमदार आणि खासदारांनी शरद पवारांकडे भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जर भाजपसोबत नाही गेलो तर ईडी आपल्याला जेलमध्ये टाकेल. त्यामुळे ईडीच्या भीतीपोटीच तुम्ही भाजपसोबत गेलात.शरद पवारांनीच बुधवारच्या चर्चेत इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये दावा केला होता. हाचा दावा प्रफुल पटेलांनी खोडून काढला आहे. भाजपसोबत जाण्याबाबत अनेकदा चर्चा झाली होती. ६-7 लोकांना त्रास होता म्हणून गेलो यात तथ्य काहीच तथ्य नसल्याचे म्हणत पटेलांनी शरद पवारांचा दावा खोडून काढला.

हे ही वाचा : दारुची पैज जीवावर बेतली!, 2 लाख कमवण्याच्या नादात धक्कादायक अंत

राष्ट्रवादीचे 51 आमदार भाजपसोबत जाणार होते?

प्रफुल पटेल पुढे म्हणाले, शरद पवारांसोबत जे नेते आहेत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड ते देखील भाजपसोबत येण्यास इच्छुक होतो असा दावा पटेलांनी केला आहे. यावेळी प्रफुल पटेल यांनी महाविकास आघाडी कोसळल्यानंतर घडलेल्या घडामोडीही सांगितल्या.

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून ज्यावेळेस एकनाथ शिंदे सुरत, गुवाहाटीत, गोव्यात फिरत होते. त्यावेळी राष्ट्रवादीही भाजप, शिंदेंसोबत सत्ता स्थापण करण्याची तयारी करत होती, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली. त्यावेळी राष्ट्रवादीचे 53 आमदार अनिल देशमुख, नवाब मलिक जेलमध्ये असल्याने त्यांना वगळता 51 आमदार भाजप, शिंदेसोबत सत्तेत जाण्याची तयारी करत होते. यावेळी या सर्व आमदारांनी भाजप, शिंदेंसोबत आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापण केली पाहिजे,असा प्रस्ताव ठेवल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. या गोष्टीवर कुणीच चर्चा करत नाही, पण सध्या जी घडामोड घडलीय त्यावर गदारोळ करतात, अशी टीका त्यांनी शरद पवार गटावर केली.

    follow whatsapp