Shiv Sena : “ज्या माणसामुळे बाहेर पडावे लागले…”, शर्मिला ठाकरेंचे उद्धव ठाकरेंना खडेबोल

विक्रांत चौहान

• 05:41 AM • 17 Jan 2024

विक्रोळीत मनेसच्या विक्रोळी महोत्सव कार्यक्रमाते आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी कार्यक्रमात बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला.

sharmila thackeray criticize uddhav thackeray shivsena ubt vikroli news raj thackeray mns maharashtra politics

sharmila thackeray criticize uddhav thackeray shivsena ubt vikroli news raj thackeray mns maharashtra politics

follow google news

Sharmila Thackeray Criticize Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनता न्यायालय घेऊन आमदार अपात्रता निकालावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. ठाकरेंच्या या जनता न्यायालयाची राजकीय वर्तुळात चर्चा असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (sharmila thackeray) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)  जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांच्यामुळे दिग्गज नेते सेनेतून बाहेर पडले, त्यांच्या हातून आता पक्ष गेल्याची टीका शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. या टीकेची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (sharmila thackeray criticize uddhav thackeray shivsena ubt vikroli news raj thackeray mns maharashtra politics)

हे वाचलं का?

विक्रोळीत मनेसच्या विक्रोळी महोत्सव कार्यक्रमाते आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी कार्यक्रमात बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. ज्यांच्यामुळे दिग्गज नेते सेनेतून बाहेर पडले आहेत, त्यांच्या हातून पक्ष गेला असल्याची टीका शर्मिला ठाकरे यांनी केला आहे.

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : शाहांनी दिला स्पष्ट ‘मेसेज’! ४८ जागांसाठी १२ क्लस्टर, स्ट्रॅटजी काय?

शर्मिला ठाकरेंचा ठाकरेंना टोला

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी वरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती.यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते. यावर माध्यमांनी प्रश्न विचारला असता, शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ‘मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला’. ‘आदित्य असं करेल असं मला वाटत नाही’. ‘पण तुम्ही ज्या भावाबरोबर लहानाचे मोठे झालात, त्या भावावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता’. ‘तुम्ही संधी मिळेल तेव्हा किणी केसवरून टोमणे मारायचे सोडले नाहीत’.’त्या भावावर विश्वास ठेवून मदत करायला हवी होती’.’मग आम्हीही त्यांचे आभार मानले असते’, अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी ठाकरेंना टोला लगावला.

आता मनसे जाणार जनता न्यायालय

महाराष्ट्र सैनिकांवर आंदोलनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. कोर्टात तुम्हाला वर्षानुवर्ष केसेस लढाव्या लागतात. न्याय मिळेल की नाही याची अपेक्षा नसते. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनी त्यांच्या त्यांच्या शाखेत एक एक जनता न्यायालय बसवावं आणि या न्यायालयात आपल्यावरी केसेस चालवून आपली निर्दोष सुटका करून घ्यावी. गरज भासल्यास वकीलांनाही बोलवावे,असे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी सांगितले आहे.

    follow whatsapp