राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं काय होणार? सर्वोच्च न्यायालयात आज नेमकं काय घडलं?

supreme court maharashtra local body election 2025 : ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर 25 नोव्हेंबर रोजी सर्वौच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात आली होती. याच सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल प्रकरणात वेळ आणखी वाढवून देण्याची मागणी केली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

25 Nov 2025 (अपडेटेड: 25 Nov 2025, 07:34 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

दिवसभरात सर्वोच्च न्यायालयात काय घडलं? 

point

ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी पार पडली

Supreme Court Maharashtra Local Body Election 2025 : ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर 25 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात आली होती. याच सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल यांनी या प्रकरणात वेळ आणखी वाढवून देण्याची मागणी केली आहे. याचबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ही शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी करण्यात येईल असं सांगितलं. याच निर्णयाने आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

हे वाचलं का?

दिवसभरात सर्वोच्च न्यायालयात काय घडलं? 

सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी वकिलांकडून काही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच बांठिया आयोगाच्या आधीच्या परिस्थितीवर कसलंही आरक्षण नव्हतं. तेव्हाचा कायदा हा खानविलकरांच्या खंडपीठाने दिलेले निकालपत्र असून त्यात आरक्षण नसल्याचा दावा याचिकार्त्यांनी केला असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबतच आता कोर्टानेच काय ते ठरवावं, असे सॉलिटर जनरल तुषार मेहता म्हणाले होते. 

आम्ही सद्हेतूने न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला असून आम्ही इतर माहिती मिळव आहोत. एका दिवसानंतर ही सुनावणी करता येईल का? असा प्रश्न करत मेहता यांनी सुनावणीबाबत मागणी केली आहे. यावर कसलंही मत मांडत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. 

तसेच ओबीसी आरक्षण, प्रश्न कसा सोडवायचा याबाबत सविस्तर अहवाल सादर करायचा आहे. यामुळे शुक्रवारपर्यंत वेळ मिळावी अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. त्यावर आता याचिकार्त्यांनी आक्षेप घेतला आहे. 

तसेच पुढे याचिकाकर्त्यांनी 50 टक्के आरक्षणाचे उल्लंघन झाल्याचे सांगितले. त्यावर सरन्यायाधीशांनी सांगितलं की, या प्रकरणातील आदेशाला बांधील राहूनच निवडणूक होणार आहेत. त्यानंतर आयोग म्हटलं की, तुम्ही जो निर्णय केला आहात अगदी त्यानुसारच निवडणूक होणार आहे. त्यानंतर सरन्यायाधीशांनी पुढील सुनावणी ही शुक्रवारी पार पडणार असल्याचे सांगितले. 

    follow whatsapp