‘प्रणिती आणि मला भाजपची ऑफर’, सुशील कुमार शिदेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

• 08:27 AM • 17 Jan 2024

माझा दोनवेळा पराभव झाला असताना प्रणिती आणि मला भाजपमध्ये या असे म्हणतात. पण माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि मी कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही, असे सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं आहे .

sushil kumar shinde big revealation praniti and me bjp offer maharashtra politics

sushil kumar shinde big revealation praniti and me bjp offer maharashtra politics

follow google news

Sushil Kumar Shinde and Praniti Shinde Bjp Offer : विजयकुमार बाबर, सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी खळबळ माजवून टाकणारे विधान केले आहे. प्रणिती आणि मला भाजप पक्षात प्रवेश करण्याची ऑफर असल्याचे विधान सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. माझा दोनवेळा पराभव झाला असताना प्रणिती आणि मला भाजपमध्ये येण्यास सांगितले जात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट सुशील कुमार शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. (sushil kumar shinde big revealation praniti and me bjp offer maharashtra politics)

हे वाचलं का?

सुशील कुमार शिंदे हे अक्कलकोट येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. माझा दोनवेळा पराभव झाला असताना प्रणिती आणि मला भाजपमध्ये या असे म्हणतात. पण माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि मी कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही, असे सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलं आहे .

हे ही वाचा : MVA : काँग्रेस आंबेडकरांच्या कात्रीत! ‘न्याय यात्रे’त सहभागी होणार, पण ‘या’ अटीवर

काय म्हणाले सुशील कुमार शिंदे?

माझा दोनदा पराभव झाला असताना, प्रणिती आणि मला भाजपमध्ये या असे म्हणतात. हे कस शक्य आहे. ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो, जिथे आमचं बालपण, तारूण्य गेलं आहे. आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता मी कसा दुसऱ्याशी घरोबा करणार, शक्य नाही, असे विधान सुशील कुमार शिंदे यांनी केले आहे. शिंदे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सूरू झाल्या आहेत.

    follow whatsapp