'गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायचा नाही..सहन करायचं..' भोर अत्याचार प्रकरणावरुन सुषमा अंधारे संतापल्या

'कुठल्याही आईचं काळीज असणाऱ्या जीवाचा थरकाप व्हावा अशी ही घटना. पण यावर आपण अजिबात गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायचा नाही. आपण अजिबात त्यावर प्रश्न विचारायचे नाहीत. कारण प्रश्न विचारल्यावर आपण राजकारण करतोय.'

Sushma Andhare On Fadnavis

Sushma Andhare On Fadnavis

मुंबई तक

02 May 2026 (अपडेटेड: 02 May 2026, 10:49 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'त्यांचा राजीनामा मागायचा नाही..सहन करायचं..'

point

भोर प्रकरणावरुन सुषमा अंधारे संतापल्या

point

फडणवीसांना काय म्हणाल्या?

Sushma Andhare On Fadnavis : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये संतापजनक घटना घडली. आजीकडे सुटीसाठी आलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करुन हत्या केली. यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण असून गावकरी आक्रमक झाले आहेत. याप्रकरणावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या जाणून घेऊया.

हे वाचलं का?

अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

या प्रकरणावरुन फडणवीसांवर टीका करताना त्या म्हणाल्या की, 'नसरापूर पुणे परिसरात एका चार वर्षाच्या मुलीला अत्याचार करुन ठेचून संपवलं जातं. जिथं माणुसकीला काळिमा म्हणण्यापेक्षा ज्याच्यावर व्यक्त व्हायला शब्द धजावत नाहीत. कुठल्याही आईचं काळीज असणाऱ्या जीवाचा थरकाप व्हावा अशी ही घटना. पण यावर आपण अजिबात गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायचा नाही. आपण अजिबात त्यावर प्रश्न विचारायचे नाहीत. कारण प्रश्न विचारल्यावर आपण राजकारण करतोय.'

हे ही वाचा : पुणे हादरलं! चार वर्षीय चिमुरडीची बलात्कार करुन निर्घृण हत्या, शेणात लपवला मृतदेह, गावकरी आक्रमक

यापुढं बोलताना त्या म्हणाल्या की, 'आपण हे सगळं गप्प निमूटपणे सहन करायचं. उलट आपण गृहमंत्री कसे इन्फ्रामॅन, गृहमंत्री कसे सुपरमॅन, गृहमंत्री कसे चाणक्य, गृहमंत्री कसे हुशार, गृहमंत्री कसे मनामनात जनाजनातले ताईत वगैरे वगैरेच्या बाता मारायच्या. आपण चकार शब्दाने बोलायचं नाही. आपण शांत रहायचं. आणि मनाशी एकच खूणगाठ बांधायची की आपण एका असुरक्षित राज्यामध्ये रहात आहोत. ज्या राज्यात चार वर्षाचं बाळसुद्धा सुरक्षितपणे खेळू बागडू शकत नाही. '

हे ही वाचा : सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मैत्रिणीवर संशय, पण तिचाही मृतदेह आढळला

गावकरी आक्रमक

चिमुरडीच्या हत्येनंतर नसरापूरमधील गावकरी आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी पोलिसांकडे केली. यावेळी गावकऱ्यांनी रास्ता रोकोदेखील केला. यावेळी पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढल्यानंतर स्थगित करण्यात आला.