Sushma andhare on omraje nimbalkar : ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी वेगळा मार्ग निवडलाय. उद्धव ठाकरेंचे लोकसभेत एकूण 9 खासदार होते, त्यातील 6 खासदारांनी त्यांची साथ सोडली आहे. या सर्वांमध्ये सर्वात जास्त चर्चा होती ती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची... लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये स्वत:ला निष्ठावंत बिरुदावली लावून यश मिळवलेले ओमराजे निंबाळकर आता शिंदेसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. मात्र, ठाकरेंचे निष्ठावंत अशी ओळख निर्माण केलेले ओमराजे निंबाळकर कसे फुटले? याची स्टोरी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितली आहे. त्या काय म्हणाल्या? सविस्तर जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
हेही वाचा : संजय राऊत भडकले, राजाभाऊ वाजेंच्या अश्रू तरळले, पत्रकार परिषदेत काय घडलं?
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
सुषमा अंधारे म्हणाल्या, काल पासून संभ्रम ओमराजे कुठे आहेत? हा संभ्रम सुरु होता. ओमराजे हलणार नाहीत, असं आम्हाला वाटत होतं. यातील प्रत्येकाने शपथा घेतल्या. कोणी आई-भवानीची शपथ घेतली. कोणी आपल्या लेकरांची आईची देखील शपथ घेतली. जे देवाची शपथ घेऊन देवालाही सोडत नाहीत. पोराबाळांची शपथ घेऊन त्यांची परवा करत नाहीत. ते पक्ष नेतृत्वाची परवा करणे हे चुकीचे आहे. परंतु, काल रात्री 10.30 एक चार्टर आलं. त्याला तानाजी सावंत लीड करत होते. त्यामध्ये नानासाहेब पाटील, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे तानाजी सावंत यांच्यासमवेत दिल्लीला गेले. खरंतर यांचं दिल्लीला जाणे अचानक नव्हतं. 10 तारखेला दिल्लीला एनडीएची बैठक झाली. मोदींनी घेतलेल्या बैठकीनंतर हॉटेल ताज मानसिंगला एक बैठक झाली. आता गेलेले लोकं त्या बैठकीला उपस्थित होते. ओमराजेंच्या एका महत्त्वाच्या केसचा निकाल आहे. निकाल 20 तारखेला येणार आहे. निकालावर हे सगळं अवलंबून असाव? आम्ही तुमचा पारंपारिक विरोधक संपवून टाकू, असा काही शब्द देण्यात आला आहे.?
हेही वाचा : चंद्रपूर : आधी आईचा जळून मृत्यू, नंतर चिमुरडा नाल्यात बुडाला; एकाच दिवशी काय घडलं?
नागेश पाटील आष्टीकरांबद्दल सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
नागेश पाटील आष्टीकर यांनी गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या जेवणावळींच्या बातम्या आमच्याकडे येत होत्या. तुमच्या जेवणावळी कुठे झाल्या हेही समजत होतं. या सगळ्या टीमचे मुख्य कॅप्टन संजय देशमुख आहेत, तर उपकर्णधार नागेश पाटील आष्टीकर आहेत. ज्या आष्टीकरांनी परवा दिवशी सांगितलं की, माझ्या मुलाला विधानपरिषदेची दोन मतं हवी आहेत. त्यासाठी नांदेडमधून तुमची मदत मिळावी. सर्व काही समजूनही मी त्यांचं बोलणं ऐकून होते. पण त्यांचं सगळं आम्हाला समजत होतं. पक्ष नेतृत्वाला फोन करुन त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतासाठी मला मदत करायला सांगितलं. त्यानंतर पक्ष नेतृत्वाने मला सांगितलं.
ADVERTISEMENT











