महिलांसोबत अनैतिक संबंध ते 50 खोके; निवडणुकीत सनसनाटी आरोप, पण आता तानाजी मुटकुळे आणि संतोष बांगर एकत्र

Tanaji Mutkule and Santosh Bangar together : काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये आमदार संतोष बांगर आणि आमदार तानाजी मुटकुळे यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. मात्र, आता हे दोन्ही नेते एकत्र आलेले पाहायला मिळाले.

Tanaji Mutkule and Santosh Bangar together

Tanaji Mutkule and Santosh Bangar together

मुंबई तक

09 Dec 2025 (अपडेटेड: 09 Dec 2025, 04:17 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलांसोबत अनैतिक संबंध ते 50 खोके; निवडणुकीत सनसनाटी आरोप

point

पण आता तानाजी मुटकुळे आणि संतोष बांगर एकत्र

Tanaji Mutkule and Santosh Bangar together, नागपूर : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यापूर्वी झालेल्या प्रचारादरम्यान अनेक नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये सर्वात चर्चेत भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांचं नाव होतं. संतोष बांगर यांचे महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचे तसेच त्यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी 50 कोटी घेतल्याचा आरोप तानाजी मुटकुळे यांनी केले होते. मात्र, आता हे दोन्ही नेते विधीमंडळाच्या अधिवेशनात एकत्र आलेले पाहायला मिळाले आहेत. त्यांनी एकत्र उभारुन फोटो देखील काढलाय. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

हे वाचलं का?

हेही वाचा : नालासोपारा : लपाछपीचा खेळ 8 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला, 4 दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह

तानाजी मुटकुळे काय म्हणाले होते?

महायुतीत आपण असलो, तरी ही आघाडी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या नेत्यांपुरतीच मर्यादित आहे. हिंगोलीमध्ये प्रत्यक्षात कधीही खरी युती झाली नाही. माझ्या चारही निवडणुकांत संतोष बांगर यांनी माझ्यासाठी काम केलेलं नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही मदत केली नाही. त्यामुळे त्यांना ‘मित्र’ म्हणण्याचे कोणतेही कारण नाही. अगदी विधानसभा निवडणुकीत देखील संतोष बांगर यांनी स्वतःचे मतदान मला दिले नव्हते, असा धक्कादायक दावा हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला होता.

दरम्यान, तानाजी मुटकुळे यांनी आरोप केल्यानंतर संतोष बांगर त्यांना शिवीगाळ देखील केली होती. मात्र नगरपालिका निवडणुकीत एकमेकांना शिवीगाळ करणारे आणि गंभीर आरोप करणारे तानाजी मुळकुटे आणि संतोष बांगर आता एकत्र आल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

नालासोपारा : लपाछपीचा खेळ 8 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला, 4 दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह

    follow whatsapp