Bhaskar Jadhav : ''ठाकरेंच सरकार आलं तरी मला काही मिळणार नाही''

मुंबई तक

10 Mar 2024 (अपडेटेड: 10 Mar 2024, 07:33 PM)

Bhaskar Jadhav Big Statement : ' थोडासा संभ्रम निर्माण झालाय, खूप वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे याबाबतचा खुलासा करणे गरजेचे आहे. ''उद्या उद्धव ठाकरेंची सत्ता येईल, पण तुम्हाला काय वाटतं यात मला काय मिळेल. तुम्हाला आजच सांगून टाकतो, मला काही मिळायचं नाही.

thackeray group mla bhaskar jadhav big statement udhhav thackeray shiv sena leader yogesh kadam allegation narayan rane maharashtra politics

''उद्या उद्धव ठाकरेंची सत्ता येईल, पण तुम्हाला काय वाटतं यात मला काय मिळेल.

follow google news

Bhaskar Jadhav Big Statement : गोकुळ कांबळे, रत्नागिरी :  ''उद्धव ठाकरेंची उद्या सत्ता येईल, पण मला काहीच मिळणार नाही. कार्यकर्त्यांना वाटतं मला काही मिळले,पण तुम्हाला आज सांगून टाकतो, मला काही मिळणार नाही, असं मोठं विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव करत (Bhaskar Jadhav) उद्धव ठाकरेंविरोधात (udhhav thackeray) नाराजी व्यक्त केली आहे. ''उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजप नेते त्यांच्यावर टीका करायचे, पण उद्धव ठाकरेंनी  ज्यांना मंत्रिपद दिली त्यामधील किती नेत्यांनी त्यावेळी तोंड उघडली, असा सवाल जाधवांनी करत, मला मंत्रिपद मिळालं नाही तरी मी लढल्याचा दाखला दिला.  (thackeray group mla bhaskar jadhav big statement udhhav thackeray shiv sena leader yogesh kadam allegation narayan rane maharashtra politics) 

हे वाचलं का?

भास्कर जाधव चिपळूणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, थोडासा संभ्रम निर्माण झालाय, खूप वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे याबाबतचा खुलासा करणे गरजेचे आहे. ''उद्या उद्धव ठाकरेंची सत्ता येईल, पण तुम्हाला काय वाटतं यात मला काय मिळेल. तुम्हाला आजच सांगून टाकतो, मला काही मिळायचं नाही. आणि मी त्याच्याकरता लढतच नाही. त्यामुळे मला त्याच दु:खच नाही. ज्याची अपेक्षाच मी केली नाही. ते मला मिळणार नाही त्यांच दु:ख काय मला वाटणार आहे, भास्कर जाधव म्हणालेत. 

हे ही वाचा : भाजपला धक्का! खासदाराचा राम राम, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

मी जो लढतोय तो काही मिळेल या आशेने लढत नाही. आणि मिळायचं होत तर मला 2019 ला मंत्री करायला हवं होतं.  कारण सगळ्यात सिनीयर मीच होतो. पुर्वी शरद पवारांनी मला मंत्री केलंच होतं ना. इथं मला केलं, नाही. मी कधीतरी माझ्या भाषणात याचा उल्लेख केला का, असा सवाल देखील भास्कर जाधवांनी ठाकरेंना केला आहे.  तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजप नेते त्यांच्यावर सकाळ-दुपार टीका करायचे. त्यावेळेला ज्यांना मंत्रिपद दिली होती. त्यामधील किती जणांनी तोंड उघडली होती. मला मंत्रिपद मिळालं नाही तरी मीच लढलो होतो, असे देखील भास्कर जाधवांनी सांगितले. 

हे ही वाचा : "शिल्लक शिवसेनेचे अध्यक्ष", थेट ठाकरेंवरच वार; मविआमध्ये उफाळला वाद

मला गटनेताही केले नाही 

''पक्ष फुटला तेव्हा गटनेता म्हणून माझाच दावाच होता. पण त्यावेळी मला गटनेता केले नाही. तेव्हा मी काही बोललो नाही. त्यानंतर भाजपला विरोध करणारा मी एकटा होतो. 20 तारखेला मतदान झाले. मी 21 तारखेला इथेच होतो. त्यानंतर उद्धव ठाकरेंना फोन आला. मी मुंबईला गेलो. उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. त्या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मी सरळ सांगितले, तुम्ही भाजपसोबत गेलात तर मी तुमच्यासोबत नसणार, सर्व गेले तरी चालतील. आपण दोघे राहिले तरी चालतील. परंतू भाजपविरोधात आपण लढत राहु, असे आपणास उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. 

    follow whatsapp