Lok Sabha 2024 : भाजपला धक्का! खासदाराने काँग्रेसमध्ये केला प्रवेश
MP Brijendra Singh joined congress : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजप खासदाराने दिला पक्षाचा राजीनामा
ब्रिजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये केला प्रवेश
हिस्सार लोकसभा मतदारसंघाचे खासदार
MP Brijendra Singh News : हरयाणातील हिस्सार लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला. भाजप सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत ब्रिजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Brijendra Singh, BJP MP from Hisar Lok Sabha seat of Haryana, Brijendra Singh has resigned from the party)
ब्रिजेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून भाजपचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. राजकीय कारणामुळे मी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे ब्रिजेंद्र सिंह यांनी सांगितले. मला हिस्सारचे खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्ष (भाजप) तसेच पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शहा यांचे आभार मानू इच्छितो, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >> "शिल्लक शिवसेनेचे अध्यक्ष", थेट ठाकरेंवरच वार; मविआमध्ये उफाळला वाद
भाजपचा राजीनामा दिल्यानंतर ब्रिजेंद्र सिंह यांनी त्यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांची दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
हरयाणात लोकसभेच्या 10 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले, तर भाजपने सर्व 10 जागा जिंकल्या होत्या. हिस्सारमधून भाजपचे उमेदवार ब्रिजेंद्र सिंह यांनी 314068 मतांनी विजय मिळवला होता.










