"शिल्लक शिवसेनेचे अध्यक्ष", थेट ठाकरेंवरच वार; मविआमध्ये उफाळला वाद

ऋत्विक भालेकर

North West Mumbai Lok Sabha 2024 : संजय निरुपम यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच डिवचलं आहे. त्यामुळे मविआसमोर नवा संघर्ष मिटवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

ADVERTISEMENT

संजय निरुपम यांचा भाजपच्या सूरात सूर... शिल्लक सेना म्हणत टीका केली.
संजय निरुपम यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संजय निरुपम यांची टीका

point

ठाकरेंच्या सेनेला म्हणाले शिल्लक सेना

point

महाविकास आघाडीत नवा वाद

Lok Sabha Election : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा पेच कायम असताना नवा संघर्ष उफाळून आला आहे. याला कारण ठरलं ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी केलेली उमेदवाराची घोषणा. या घोषणेनंतर काँग्रेसमधून थेट ठाकरेंवर पहिला वार करण्यात आला आहे. शिल्लक शिवसेना संबोधत काँग्रेसचे संजय निरुपम यांनी अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे. 

महाविकास आघाडीमध्ये 48 पैकी 8 जागांवर पेच फसलेला आहे. असे असतानाच उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांना त्यांचे वडील गजानन कीर्तिकर यांच्याविरोधात मैदानात उतरवले आहे. त्यांच्या नावाची घोषणा होताच या जागेवरून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत असलेले काँग्रेसचे नेते संजय निरुपम बिथरले आणि त्यांनी थेट ठाकरेंवरच पहिला वार केला. 

शिल्लक शिवसेनेचे अध्यक्ष....

संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर टीका करताना त्यांची शिल्लक शिवसेनेचे अध्यक्ष असे म्हणत खिल्ली उडवली आहे. ""काल सायंकाळी शिल्लक शिवसेनेच्या प्रमुखांनी अंधेरीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केली", असे निरुपम म्हणाले. 

निरुपम यांच्या पोस्टमुळे महाविकास आघाडीतील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेत्याची खदखदही बाहेर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे निरुपम यांनी महाविकास आगाडीचे उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अमोल कीर्तिकर यांना घोटाळेबाज, लाचखोर आणि कमिशन घेणाराही म्हटले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp