‘..देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल’, मुंबई महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Mumbai Mahapalika Election Results 2026 : “आपल्यामध्ये आणि भाजपमध्ये मोठा फरक आहे. ते कधी जमिनीवर राहू शकत नाहीत. गद्दार निघून गेले, पण आमची निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. “मी सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. आता आपली जबाबदारी अधिक वाढलेली आहे,” असेही ते म्हणाले.

Uddhav Thackeray on Mumbai Mahapalika Election Results 2026

Uddhav Thackeray on Mumbai Mahapalika Election Results 2026

मुंबई तक

17 Jan 2026 (अपडेटेड: 17 Jan 2026, 03:23 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

‘..देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल’,

point

मुंबई महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Mumbai Mahapalika Election Results 2026 : मुंबई महापालिकेच्या निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया दिली. निकालानंतर मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार टीका करत कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. “देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल,” असे म्हणत त्यांनी महापौरपदाबाबत आशावाद व्यक्त केला.

हे वाचलं का?

मुंबई महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया 

उद्धव ठाकरे म्हणाले, “या यशाचे खरे मानकरी तुम्ही सगळे आहात. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. जी परिस्थिती होती, ज्या पद्धतीने साम-दाम-दंड-भेदाचा वापर झाला, यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात आला, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जो निकाल लागला आहे तो निश्चितच अभिमानास्पद आहे.” त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भाजपला कागदावरची शिवसेना संपवता आली असेल, पण जमिनीवरची शिवसेना कधीच संपवता येणार नाही.

“आपल्यामध्ये आणि भाजपमध्ये मोठा फरक आहे. ते कधी जमिनीवर राहू शकत नाहीत. गद्दार निघून गेले, पण आमची निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. “मी सगळ्यांना मानाचा मुजरा करतो. आता आपली जबाबदारी अधिक वाढलेली आहे,” असेही ते म्हणाले.

महापौरपदावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आपला महापौर व्हायला पाहिजे, हे तर स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही नक्की होईल.” तसेच, “गद्दारी करून ज्यांनी विजय मिळवला आहे, त्यांनी हा विजय मुंबई गहाण ठेवण्यासाठी मिळवला आहे. या पापाला मराठी माणूस कधीही क्षमा करणार नाही,” अशा कठोर शब्दांत त्यांनी टीका केली.

हेही वाचा : ठाण्यातील 21 वर्षीय एअर होस्टेसने संपवलं आयुष्य; एक्स बॉयफ्रेंडविरुद्ध गुन्हा दाखल

शिवसैनिकांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला तुमचा अभिमान आहे. तुम्ही निष्ठेने लढलात. मी फिरत असताना कोणत्याही प्रकारच्या सुविधा आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही. आमच्याकडे तन-मन आहे, त्यांच्याकडे फक्त धन आहे. तरीसुद्धा तुम्ही शक्तीच्या बळावर त्यांना घाम फोडला.” ही शक्ती अशीच एकत्र ठेवा, पुढच्या पिढीलाही तुमचा अभिमान वाटेल, असा संदेश त्यांनी दिला.

“हे यश मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन अर्पण करतो. विजयाचे संपूर्ण श्रेय तुम्हालाच आहे. लढाई अजून संपलेली नाही. जिद्द महत्त्वाची आहे आणि ती कोणीही विकत घेऊ शकत नाही. या जिद्दीच्या जोरावर आपण पुन्हा जिंकू,” असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या निवडणुकीत ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे एकत्र लढली, तर भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना युतीत उतरली होती. निकालानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी ठाकरे गटानेही आपली ताकद कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

मुंबई महापालिका निवडणूक निकाल – जागावाटप :
भारतीय जनता पार्टी – 89
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 65
शिवसेना (शिंदे गट) – 29
इंडियन नॅशनल काँग्रेस – 24
ऑल इंडिया मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन – 8
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 6
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – 3
समाजवादी पार्टी – 2
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) – 1

या निकालानंतर मुंबईचा महापौर कोणाचा होणार, याबाबतचे राजकीय समीकरण आता अधिकच रंगतदार बनले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ठाकरेंच्या उमेदवारासाठी रवीना टंडनचा प्रचार, पण 'त्या' वार्डात निकाल काय आला? अभिनेत्री परदेशात गेल्याने चर्चेला उधाण

    follow whatsapp