नगरपंचायत बिनविरोध करण्यासाठी अनगरमध्ये दहशत? अर्ज भरु नये म्हणून पाठलाग; महिलेचे भाजप नेत्यावर आरोप

Ujjwala Thite and Anagar nagarpanchayat : नगरपंचायत बिनविरोध करण्यासाठी अनगरमध्ये दहशत? अर्ज भरु नये म्हणून पाठलाग; महिलेचे भाजप नेत्यावर आरोप

Ujjwala Thite and Anagar nagarpanchayat

Ujjwala Thite and Anagar nagarpanchayat

मुंबई तक

17 Nov 2025 (अपडेटेड: 17 Nov 2025, 09:50 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नगरपंचायत बिनविरोध करण्यासाठी अनगरमध्ये दहशत?

point

अर्ज भरु नये म्हणून पाठलाग; महिलेचे भाजप नेत्यावर आरोप

Ujjwala Thite and Anagar nagarpanchayat : "मोहोळमध्ये अनगर नगरपंचायत निवडणूक लागली आहे. मी निवडणुकीचा अर्ज भरणार आहे. मात्र, गेली 3 दिवस झाले मी अनगर नगर पंचायत येथे फॉर्म भरायला जावू नये म्हणून आमचा पाठलाग करत गाड्या फिरत आहेत. भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील, विक्रांत पाटील आणि अजिंक्यराणाा पाटील माझ्यापासून निवडणूक लढवण्याचा अधिकार हिसकावून घेत आहेत", असा आरोप उज्वला थिटे यांनी केला आहे.

हे वाचलं का?

उज्ज्वला थिटे म्हणाल्या, निवडणूक बिनविरोध करायची की नाही? हे जनता ठरवेन. मला अर्ज भरु दिला जात नाही. कॉर्नरवर हजारो लोकं उभे केले आहेत. मी आठ दिवस झालं पोलिसांना प्रोटेक्शन मागत आहे. गृहमंत्री साहेब एवढी घाण तुम्ही तुमच्या पक्षात घेतली आहे. महाराष्ट्रातील जनतेने पाहावं, आमचा निवडणुकीचा अधिकार हिसकावून घेतला जातोय. वाटेवर प्रत्येक ठिकाणी ट्रॅप लावले आहेत.

अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्यानंतर उज्ज्वला थिटे गेल्या काही दिवसांपासून अर्ज दाखल करण्यासाठी धडपड करत होत्या. मात्र, त्यांनी नामनिर्देशन सादर करू नये आणि स्थानिक निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी भाजप नेते राजन पाटील अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप थिटे यांनी केला आहे.

हेही वाचा : अभिजीत बिचुकलेंनी ठोकले शड्डू, साताऱ्याला सितारा करणार म्हणत, उदयनराजेंचं नाव न घेता म्हणाले, मलाही...

अनगर नगरपंचायतीसाठी प्रथमच निवडणूक

मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीसाठी प्रथमच निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. अनगर ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून पाटील परिवाराने येथे आपले वर्चस्व कायम ठेवले असून, ग्रामपंचायत निवडणुकीत आजपर्यंत त्यांना कधीही विरोधाचा सामना करावा लागला नव्हता. गावातील ऐक्यामुळे विरोधी गटांनीही या भागाकडे फारसे लक्ष दिले नव्हते. सप्टेंबर 2021 मध्ये अनगर ग्रामपंचायत नगरपंचायतीत रूपांतरित झाली आणि आता प्रथमच नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. येथे सुमारे 11 हजार मतदार नोंदणीकृत आहेत.

यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना, पक्षाच्या उमेदवाराला त्या भागातील एका मतदाराची सूचनाच पुरेशी असते, तर अपक्ष उमेदवाराला पाच सूचक अनिवार्य आहेत. सर्व सूचक हे स्थानिक मतदार असणे आवश्यक आहे. अनगर आणि त्याच्या 12 वाड्यांमध्ये राजन पाटील यांचा प्रभाव कायम असल्याने, त्यांच्या विरोधात कोण उमेदवारी घेणार? याबाबत संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही विरोधी उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याचं चित्र आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मला मारण्यासाठी चप्पल उचलली, शिव्या दिल्या, मला अनाथ केलं गेलंय, लालू यादवांच्या कन्येची खळबळजनक पोस्ट

 

 

    follow whatsapp