Beed Crime: बीडमधील केज तालुक्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराडच्या समर्थकाकडून मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीचं नाव नानासाहेब चौरे असून तो काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडला सोडण्यात यावं म्हणून टाकीवर चढून आंदोलन केल्याबद्दल चर्चेत होता.
ADVERTISEMENT
मतिमंद मुलीवर बलात्कार
काल म्हणजेच 2 जुलै रोजी केज पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात राहणाऱ्या मतिमंद मुलीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. नानासाहेब चौरे या वाल्मिक कराडच्या समर्थकाने त्या मतिमंद तरुणीवर बलात्कार केला. पीडित तरुणीसोबत हे घडत असताना तिच्या नात्यातील एका महिलेने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने तिला "याबद्दल कोणालाही सांगू नको नाहीतर तुझं काही खरं नाही." अशी धमकी देखील दिली.
हे ही वाचा: मोठ्या दिराकडून गरोदर.. सासऱ्यासोबत शरीर संबंध, अनैतिक संबंधांना चटावलेल्या पुजाचे भयंकर कारनामे!
गप्प राहण्याची धमकी
या प्रकरणातील पीडित तरुणी तिच्या नात्यातील महिलेसोबत उपचारासाठी आरोग्य केंद्रात जात होती. त्यावेळी ठिकाणी पीडितेसोबत असलेली महिला आत गेल्यानंतर पीडितेवर चौरेने बलात्कार केला. बळजबरी बलात्कार करताना पिडीतेच्या नात्यातील महिलेने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तिला धमकावून गप्प राहण्यास सांगितलं. पीडितेच्या नात्यातील महिलेच्या फिर्यादीवरून केज पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा: Infosys चा ऑफिसमध्ये कर्मचाऱ्याचा भलताच कांड, कमोडवर चढून शूट करायचा तरूणीचे अश्लील Video
आरोपीवर बलात्कार, जबरदस्ती व धमकावणे या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी नानासाहेब चौरेवर यापूर्वी सुद्धा लैंगिक अत्याचार, बाल शोषण, छळ आणि दारू विक्रीचे अपहरण असे आरोप आहेत.
ADVERTISEMENT
