मुंबई Tak बैठक: अजित पवार नॉट रिचेबल असताना कुठे होते?, फडणवीसांनी खरं काय ते सांगूनच टाकलं!

साहिल जोशी

13 Apr 2023 (अपडेटेड: 13 Apr 2023, 12:09 PM)

Mumbai Tak Baithak: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नॉट रिचेबल असताना नेमके कुठे होते. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय विधान केलं आहे जाणून घ्या सविस्तर.

ajit pawar when he was not reachable devendra fadnavis told the truth in mumbai tak baithak

ajit pawar when he was not reachable devendra fadnavis told the truth in mumbai tak baithak

follow google news

Devendra Fadnavis on Ajit Pawar: मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. अर्थातच.. विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नॉट रिचेबल होण्यामुळे अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. साधारण तीन-चार दिवसांपूर्वी अजित पवार हे अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यावेळी ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांची गुपित भेट घेण्यासाठी गेल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, याचबाबत आता स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार नॉट रिचेबल असताना नेमके कुठे होते याबाबत मुंबई Tak बैठक (Mumbai Tak Baithak) या विशेष कार्यक्रमात भाष्य केलं आहे. (where exactly was ajit pawar when he was not reachable devendra fadnavis told the truth in mumbai tak baithak)

हे वाचलं का?

‘लोकांना अजितदादा आणि माझ्याबाबत बराच संभ्रम झालाय…’

मुंबई Tak बैठकमध्ये देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार आणि त्यांच्यात नेमकं राजकीय नातं कसं आहे याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी याविषयी सविस्तर भाष्य केलं. पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले.

‘खरं तर असं झालंय की, समजा ते सरकार आमचं 72 तासांचं होतं… ते गेल्यानंतर अजित पवार इतके डिफेन्सिव्ह होते की, ते मला भेटायचे देखील नाही. त्यानंतर आमची भेट ही कोव्हिडच्या उपाय नियोजनाच्या निमित्ताने फक्त 2 वेळा झाली. त्याशिवाय आमची कधीही भेट झाली नाही. तुम्हाला सांगतो की, काय झालंय… की लोकांच्या मनात देखील एवढे संभ्रम निर्माण झाले आहेत.’

अधिक वाचा- शरद पवारांच्या मनात काय? जयंत पाटलांनी सांगितली 2019 ची स्टोरी; म्हणाले,…

‘आता परवा अजितदादा कुठल्या तरी पुण्याच्या कार्यक्रमातून निघून गेले.. त्यादिवशी माझा फाईल डे असल्याने.. म्हणजे मी आठवड्यातून एक दिवस ठेवतो की, मी सगळ्या फाइल्स काढतो. त्या दिवशी मी कोणतेही कार्यक्रम करत नाही. तर सकाळचा एक कार्यक्रम माझ्या टाइमलाइनवर होता आणि त्यानंतर मी दिवसभर बसून सगळ्या फाइल्स क्लिअर करायच्या होत्या आणि त्यामुळे माझ्या टाइमलाइनवर कार्यक्रम दिसत नव्हता. तर लोकांना असं वाटायला लागलं की, अरे परत काही सुरू झालं की, म्हणजे लगेच चर्चा चालू. आणि त्या चर्चा कुठपर्यंत पोहचतात.. बरं झालं की, मी त्या दिवशी काही पत्रकारांना गप्पा मारायला बोलावलं होतं त्यामुळे ते माझ्याच घरी होते.’

‘तर दुसरीकडे चर्चा कुठपर्यंत पोहचल्या की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नागपूरला भेटले.. म्हणजे मी मु्ंबईमध्ये ते कुठे हे मला माहित नव्हतं.’

अधिक वाचा- ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य’; देवेंद्र फडणवीसांचं ‘मुंबई Tak बैठक’मध्ये मोठं भाकित

‘मी शिंदेंना वेष बदलून भेटायला जायचो हे माझ्या पत्नीने जे मुलाखतीत सांगितलं ते गंमतीत सांगितलं होतं. हा गंमतीचा भाग असतो. पण ठीक आहे की, हे खरंच आहे की.. शेवटच्या काळात शिंदेंसोबत चर्चा झाली.. ते तुम्हाला नाही कळलं.. पण चर्चा तुम्हाला कळली असती तर ते झालं असतं का? मग अशा गोष्टी तुम्हाला कशा सांगू आम्ही.. कशा तुम्हाला कळवू..’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांविषयी नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट केलं.

अधिक वाचा- Maharashtra politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? अंजली दमानियांची स्फोटक पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे किती आमदार संपर्कात, फडणवीसांनी दिलं उत्तर

‘राज्यात अशी चर्चा सुरू आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार भाजपमध्ये येणार आहेत. काँग्रेसमधील काही आमदार तुमच्यासोबत येऊ शकतात. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील बहुमत चाचणीला काँग्रेसचे 17 आमदार गैरहजर होते. त्यावरूनही तर्कविर्तक सुरू होते. त्यामुळे माध्यमांचं काम खूप कठीण झालं आहे. तुम्ही असं वागता आणि नंतर माध्यमांना जबाबदार ठरवतात. तुमच्या संपर्कात काही आमदार आहेत का?’ असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “असं आहे की, संपर्कात नेहमीच असतात. कारण शेवटी मागच्या वर्षात बघितलं तर सत्तारुढ पक्षात काम करत असताना आपण संबंध निर्माण करतो. त्यासंबंधामुळे आणि आपल्या आत्मविश्वासामुळे अनेक लोकसोबत येतात. गेल्या पाच वर्षात अनेक लोक आले. त्यामुळे संपर्कात अनेक लोक आहेत, त्यातील किती लोक येतील हे आज पक्कं सांगता येणार नाही. आमदार संपर्कात असतातच”, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

    follow whatsapp