Praveen Sood : कर्नाटकाचे डीजीपी आता सीबीआयचे नवीन प्रमुख, कोण आहेत सूद?

Who is IPS Praveen Sood New Cbi Director : केंद्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद (Praveen Sood) यांची केंद्रीय अन्वेशन विभागाच्या (CBI)संचालकपदी नियुक्ती केली आहे. सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ 25 मेला संपणार आहे.

Who is IPS Praveen Sood New Cbi Director

Who is IPS Praveen Sood New Cbi Director

मुंबई तक

• 02:48 PM • 14 May 2023

follow google news

Who is IPS Praveen Sood New Cbi Director : केंद्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद (Praveen Sood) यांची केंद्रीय अन्वेशन विभागाच्या (CBI)संचालकपदी नियुक्ती केली आहे. सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ 25 मेला संपणार आहे. त्यांच्या जागी आता प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेशन विभागाच्या (CBI)संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेमके हे प्रवीण सूद कोण आहेत? हे जाणून घेऊयात.(who is ips officer praveen sood appointed as cbi director)

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जस्टीस डी. वाय. चंद्रचुड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजर चौधरी यांच्यामध्ये शनिवारी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे अधीर रंजन चौधरी यांनी बैठकीत प्रवीण सूद यांच्या उमेदवारांवर आक्षेप घेतला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    follow whatsapp