भारताने या ऑपरेशनला 'सिंदूर' असं नाव का दिलं? त्यामागचा अर्थ काय?

या कारवाईमध्ये दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला. या कारवाईत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत.

Mumbai Tak

मुंबई तक

07 May 2025 (अपडेटेड: 07 May 2025, 08:13 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारताच्या पाकिस्तानवर एअर स्ट्राईक्स

point

दहशतवाद्यांची तळं टार्गेट केल्याची माहिती

point

ऑपरेशनला सिंदूर असं नाव का दिलंं?

Pehalgam : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनके निष्पाप लोकांना दहशतवाद्यांना निघृणपणे मारलं होतं. या घटनेनंतर देशभरात मोठा संताप पाहायला मिळाला होता. या संपूर्ण प्रकरणात सर्वात जास्त चर्चा झाली ती दहशतवाद्यांनी पुरूषांना  मारून तिथे उपस्थित असलेल्या महिलांचा सिंदूर त्यांच्या डोळ्यादेखत पुसून टाकला होता.

हे वाचलं का?

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या कृत्यांना ब्रेक लावण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केलं आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताने एक मोठं पाऊल उचललं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, 'ऑपरेशन सिंदूर' ही सैन्य, हवाई दल आणि नौदलाची संयुक्त कारवाई होती.

ऑपरेशन सिंदूर नाव का? 

हे ही वाचा >> मध्यरात्रीच हादरवून टाकलं... पाकिस्तानच्या 'या' 9 ठिकाणी भारताचा अचूक हल्ला, नेमका कुठे-कुठे केला Air Strike?

हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लेफ्टनेंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांनी अत्यंत हतबल अवस्थेत मृतदेहाजवळ बसून आक्रोश केला होता. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर देशभरात मोठा संताप व्यक्त केला गेला. 

हे ही वाचा >> रात्री दीडची वेळ, पाच ठिकाणी दहशतवादी तळांवर हल्ला... पाकच्या पंतप्रधानांनी नेमकं काय म्हटलं?

भारताने याच पार्श्वभूमीवर हल्ल्याला ऑपरेशन 'सिंदूर' असं नाव दिलं. या नावामागे पहलगामच्या बदल्याचा संदेश आहे असं दिसतंय.  त्यामुळेच भारताने अत्यंत जाणीवपूर्वक ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं. तिन्ही संरक्षण दलांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाव सुचवलं अशी माहिती आहे. 

दरम्यान, या कारवाईमध्ये दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला. या कारवाईत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. ही कारवाई पहाटे 1.30 च्या सुमारास करण्यात आली. हा हवाई हल्ला बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये करण्यात आला आहे.

    follow whatsapp