PM Modi visit Maharashtra: पंतप्रधान गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूरला येणार, सगळ्यात आधी जाणार RSS स्मृती स्थळावर

PM Modi Nagpur and gudi padwa 2025: मराठी नववर्ष दिन म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरला येणार आहेत. जाणून घ्या त्यांच्या या महाराष्ट्र दौऱ्याचं नेमकं कारण काय.

गुढीपाडव्याच्या दिवशी PM मोदी नागपूरलाच का येणार? (फोटो सौजन्य: Gork AI)

गुढीपाडव्याच्या दिवशी PM मोदी नागपूरलाच का येणार? (फोटो सौजन्य: Gork AI)

योगेश पांडे

17 Mar 2025 (अपडेटेड: 28 Mar 2025, 03:46 PM)

follow google news

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत. पण यासाठी त्यांनी जो दिवस निवडला आहे तो देखील खूप खास आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) हे महाराष्ट्रात 30 मार्च म्हणजेच मराठी नववर्षाची ज्या दिवशी सुरुवात होते त्या गुढीपाडव्याला येणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये पंतप्रधान मोदींचा दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याची सुरुवात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती स्थळापासून करणार आहेत. त्यानंतर इतर कार्यक्रम स्थळी मोदी जाणार आहेत. 

हे वाचलं का?

पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम जसाच्या तसा...

हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिपदा कार्यक्रमाच्या अनुषंगाने, पंतप्रधान हे स्मृती मंदिराला भेट देतील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांना श्रद्धांजली वाहतील.त्यानंतर ते दीक्षाभूमी जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करतील, जिथे बाबासाहेबांनी 1956 साली त्यांच्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता.

पंतप्रधान माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरच्या नवीन विस्तारित इमारत, माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी करतील. 2014 मध्ये स्थापित, हे नागपूर येथे स्थित एक प्रमुख सुपर-स्पेशालिटी नेत्ररोग सुविधा आहे. माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही संस्था स्थापन करण्यात आली होती. आगामी प्रकल्पात 250 बेडचे रुग्णालय, 14 बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि 14 मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असतील, ज्याचा उद्देश लोकांना परवडणाऱ्या आणि जागतिक दर्जाच्या नेत्ररोग सेवा प्रदान करणं आहे.

यानंतर पंतप्रधान नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या  शस्त्रागार सुविधेला भेट देतील.ते नि:शस्त्र हवाई वाहनांसाठी (UAVs) नव्याने बांधलेल्या 1250 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद धावपट्टीचे उद्घाटन करतील तसेच लॉइटरिंग युद्धसामग्री आणि इतर मार्गदर्शित युद्धसामग्रीची चाचणी घेण्यासाठी लाईव्ह युद्धसामग्री आणि वॉरहेड चाचणी सुविधेचे उद्घाटन करेल.

मराठी नववर्षाला नागपुरातच का येणार PM मोदी?

खरं तर एका खासगी कार्यक्रमासाठी स्वत: पंतप्रधान मोदी हे नागपुरला येणार आहेत. ज्याबाबत एक प्रेस रिलीज नुकतीच देण्यात आली आहे. ज्यानुसार एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी हे नागपूरमध्ये हजेरी लावणार आहेत.

हे ही वाचा>> शरद पवारांनी दिल्लीतील 'तालकटोरा'मध्ये मराठा योध्यांचे पुतळे बसवण्याची मागणी का केली? इतिहास काय?

नागपूरमध्ये नेमका कार्यक्रम काय?

1995 मध्ये माधव नेत्रालय म्हणून सुरू झालेला प्रकल्प सिटी सेंटरच्या माध्यमातून त्यांची सेवा प्रदान करत आहे. माधव नेत्रालयाचा दुसरा सेवा प्रकल्प हा माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासूदेव नगर नागपूर येथे मागील दोन वर्षांपासून ओपीडीच्या माध्यमातून सेवा देत आहे. त्याच्याच विस्तारीकरणाची आता महत्त्वाकांक्षी योजना पुढे नेण्यात येत आहे. याच निमित्ताने रविवार 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, स्वामी अवधेशानंद गिरि महाराज, स्वामी गोविंद देव गिरिजी महाराज, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असतील.

हे ही वाचा>> Fact Check: नितेश राणे म्हणाले शिवरायांसोबत मुस्लिम नव्हतेच, आता ‘ही’ यादीच आली समोर.. काय आहे सत्य?

नवीन भवन हे 5 एकर जमिनीवर 5 लाख स्क्वेअर फूटमध्ये तयार होणार आहे. 250 बेडच्या या रुग्णालयात 14 ओपीडी आणि 14 मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असणार आहेत. 

मध्य भारताच्या प्रतिष्ठित नेत्र चिकित्सालय म्हणून उदयाला आलेल्या माधव नेत्रालयाचा उद्देश हा उच्च चिकित्सीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चॅरिटसह किमान खर्चात दृष्टीदोष निवारण करणं हा आहे.अशी माहिती माधव नेत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा गुढीपाडव्याचा असतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गुढीपाडवा सण साजरा केला जातो. तसेच विजयाचे प्रतीक मानली जाणारी गुढी देखील घराघरांत उभारली जाते.

 

    follow whatsapp