भाजप नेत्याला नडलेल्या उज्ज्वला थिटेंचा अर्जच झाला बाद, सूनबाई होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

Ujjwala Tithe : नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला तिथे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, 18 नोव्हेंबर रोजी छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Ujjwala Tithe

Ujjwala Tithe

मुंबई तक

18 Nov 2025 (अपडेटेड: 18 Nov 2025, 07:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

उज्ज्वला थिटे यांचा अर्ज रद्द

point

अर्ज बाद होण्यामागचं खरं कारण आलं समोर

Ujjwala Tithe : राज्यभरात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पण, याच निवडणुकीत सध्या चर्चेत असलेली नगरपंचायत म्हणून अनगरची ओळख आहे. यामागचं कारणंही आता तसंच समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, 18 नोव्हेंबर रोजी छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अर्ज बाद होण्यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'आज परत कोणीतरी गावी जाणार…' भाजपने शिंदेंचे नेते फोडताच आदित्य ठाकरेंनी डिवचलं, भलं मोठं ट्वीट अन्...

अर्ज बाद होण्यामागचं खरं कारण समोर

अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नसल्याने थिटे यांचा अर्ज रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली आहे. विषेशकरून हे सर्व आक्षेप अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी घेतले होते. 

उज्ज्वला तिथे यांच्या उमेदवारीमुळे एक दोन नाहीतर तब्बल 17 नगरसेवक बिनविरोध होऊन अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली होती. या निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल करण्यात आले. त्यात माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांचा भाजपकडून अर्ज दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे सरस्वती शिंदे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. तर तिसरा अर्ज हा उज्ज्वला थिटे यांचा होता. 

नगराध्यक्षपदी राजन पाटलांची सून? 

या प्रकरणात आता अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी अवघे तीन अर्ज दाखल करूनही प्रसासनाने दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान, तपासणी करताना उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला, अशातच याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. ही परिस्थिती पाहून अपक्ष उमेदवार आपला अर्ज मागे घेणार की निवडणूक लढवणार हे बघणं महत्त्वाचं असेल. जर अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास राजन पाटील यांच्या सून नगराध्यक्ष होतील, अशी शक्यता नाकारता येत नाही, पण येणारी परिस्थिती नेमकी कशी असेल यावर आताच भाष्य करता येणार नाही. 

अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी घेतलेले आक्षेप

अर्जावर सूचकाची सही नाही.

मतदार यादीतील प्रभाग व अनुक्रमांक चुकीचा असल्याचा आक्षेप केला आहे. 

थिटे यांनी त्यांच्या वयाचा पुरावा अर्जासोबत जोडला नसल्याचा तिसरा आक्षेप त्यांनी केला आहे. 

सूचकाचा मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा असल्याचा आक्षेप सरस्वती शिंदे यांनी केला आहे. 

    follow whatsapp