hardik pandya confirm relationship with mahika sharma : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या 11 ऑक्टोबर रोजी त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी हार्दिकने अखेर आपल्या नव्या नात्याची अधिकृत घोषणा इन्स्टाग्रामवर केली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना त्याने पूर्णविराम दिलाय. नताशा स्टॅनकोव्हिकपासून विभक्त झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी या स्टार अष्टपैलू खेळाडूने मॉडेल माहिका शर्मा हिला आपल्या आयुष्याची नवीन साथीदार म्हणून निवडलं आहे.
ADVERTISEMENT
हार्दिक पंड्याची इन्स्टाग्राम पोस्टने वेधलं लक्ष
हार्दिक पंड्याने 10 ऑक्टोबर 2025 रोजी इन्स्टाग्राम स्टोरीवर समुद्रकिनाऱ्यावर माहिकासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला. दोघेही आनंदी आणि शांत वातावरणात दिसत होते. हार्दिकने ओव्हरसाइज जॅकेट, शॉर्ट्स मध्ये पाहायला मिळाला, तर माहिका पांढऱ्या शर्ट ड्रेसमध्ये अतिशय स्टायलिश दिसत होती. हार्दिकने तिच्या खांद्यावर हात ठेवत तो फोटो शेअर केला आणि तिच्या इन्स्टाग्राम आयडीला टॅग करून आपलं नातं सार्वजनिक केलं. या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आणि सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली. हार्दिकच्या या पोस्टमुळे हे स्पष्ट झालं की आता त्याचं प्रेम पूर्णपणे माहिकावर जडलं आहे.
हेही वाचा : पतीच्या मित्रासोबत महिलेचे अनैतिक संबंध, शारीरिक संबंधाला चटावली आणि प्रियकरासोबत पतीलाच...
कोण आहे माहिका शर्मा?
हार्दिकपेक्षा सात वर्षांनी लहान असलेली माहिका शर्मा ही भारतीय फॅशन इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. ही मॉडेल ELLE आणि Grazia सारख्या नामांकित मॅगझिन्सच्या कव्हरवर झळकली आहे आणि ‘इंडियन फॅशन अवॉर्ड्स’मध्ये मॉडेल ऑफ द इयर हा किताब जिंकला आहे. माहिका तनिष्क, वीवो आणि यूनिक्लो सारख्या प्रसिद्ध ब्रँड्सच्या जाहिरातींमध्येही दिसली आहे. ती अनेकदा तरुण तहिलियानी, मनीष मल्होत्रा आणि अनीता डोंगरे यांसारख्या नामवंत डिझायनर्सच्या ड्रेसमध्ये झळकते.
मागील काही महिन्यांपासून हार्दिक आणि माहिका दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कधी माहिका हार्दिकसारख्याच लेपर्ड प्रिंटेड रॉबमध्ये दिसली, तर कधी तिने आपल्या बोटावर ‘33’ नंबरचा टॅटू दाखवला — जो हार्दिकच्या जर्सीचा क्रमांक आहे. आता हार्दिकच्या नव्या पोस्टनंतर सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. हार्दिक पंड्याने अधिकृतपणे माहिका शर्मा हिला आपल्या हृदयाची राणी म्हणून जगासमोर आणले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
