KL Rahul Team India : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील (IND vs PAK) सामन्यात सर्वांच्या नजरा श्रेयस अय्यरकडे लागल्या होत्या. दुखापतीनंतर अय्यरने दुखापतीतून सावरत पुनरागमन करत केलं. मधल्या षटकांमध्ये जबाबदारी पार पाडण्याची त्याला चांगली संधी होती. वरच्या फळी ढेपाळल्याने अय्यर चांगली कामगिरी करू शकला असता. सुरुवातीच्या काही मिनिटांत त्याने काही दमदार शॉट्सही खेळले, पण पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले.
ADVERTISEMENT
त्यामुळे अय्यरला नेपाळविरुद्ध कोणत्याही किंमतीत स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. मात्र, या सगळ्यात आता सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गावसकर म्हणाले की, केएल राहुल संघात परतला तर अय्यरला बाहेर पडावं लागेल. कारण तुम्ही इशान किशनला बाहेर ठेवू शकत नाही.
हेही वाचा >> समाजासाठी विकली जमीन, हॉटेलात केलं काम; कोण आहेत मनोज जरांगे?
ईशानने स्वत:ला केले सिद्ध
इशान किशनने पाकिस्तानविरुद्ध अशी कामगिरी केली जी, चाहत्यांच्या स्मरणात राहील. संघाची वरच्या फळीतील 4 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर किशनने जबाबदारी स्वीकारली आणि 81 चेंडूत 82 धावांची अप्रतिम खेळी केली. इशान किशनने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. यादरम्यान त्याने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारीही केली.
हेही वाचा >> Mumbai Crime News : एअर होस्टेस तरुणीची हत्या, पवईतील फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
किशनच्या खेळीने केवळ चाहत्यांचीच मने जिंकली नाहीत. किंबहुना या फलंदाजाने अनेक विक्रमही मोडीत काढले. इशानने विराट कोहली आणि एमएस धोनीला मागे टाकले. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा किशन आता पहिला यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावावर 76 धावांचा होता. 17 डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून इशानने विराटला मागे सोडले.
फ्लॉप झाला तर अय्यरला टीममधून जावे लागणार बाहेर
सुनील गावसकर म्हणाले, नेपाळविरुद्धच्या सामन्यात अय्यर काय करतो हे मी पाहीन. कदाचित त्याला फलंदाजीची संधीही मिळणार नाही. कारण टीम इंडियाचे टॉप 3 फलंदाज पूर्ण 40 षटके खेळण्याची शक्यता आहे. पण अय्यरला संधी मिळाली आणि त्याला धावा करता आल्या नाहीत, तर त्याच्यासाठी ते कठीण होईल. यानंतर तुम्ही राहुल आणि इशानला 4 आणि 5 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाईल. कारण पाकिस्तानविरुद्ध 80 धावा करणाऱ्याला तुम्ही टीममधून बाहेर ठेवू शकत नाही. म्हणजे राहुलची एन्ट्री झाल्याने अय्यरला संघातून बाहेर व्हावे लागेल. कारण इशान किशन हा डावखुरा आहे आणि याचाही संघाला फायदा होतो.
ADVERTISEMENT
