IPL 2021 : प्ले-ऑफमध्ये चौथ्या स्थानासाठी चुरशीची शर्यत, जाणून घ्या काय आहेत प्रत्येक संघांसाठीचे निकष

मुंबई तक

• 09:59 AM • 05 Oct 2021

UAE मध्ये सुरु असलेला आयपीएलचा चौदावा हंगाम आता रंगतदार स्थितीत आलेला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे तीन संघ प्ले-ऑफमध्ये दाखल झाले आहेत. चौथ्या स्थानासाठी सध्या मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स या तीन संघांमध्ये चुरशीची लढत आहे. पॉईंट टेबलमध्ये सध्याची स्थिती काय आहे? मंगळवारी मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्याला सुरुवात […]

Mumbaitak
follow google news

UAE मध्ये सुरु असलेला आयपीएलचा चौदावा हंगाम आता रंगतदार स्थितीत आलेला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे तीन संघ प्ले-ऑफमध्ये दाखल झाले आहेत. चौथ्या स्थानासाठी सध्या मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स या तीन संघांमध्ये चुरशीची लढत आहे.

हे वाचलं का?

पॉईंट टेबलमध्ये सध्याची स्थिती काय आहे?

मंगळवारी मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्याला सुरुवात होण्याआधी कोलकाता नाईट रायडर्स १२ गुणांसह चौथ्या, पंजाब किंग्ज १० गुणांसह पाचव्या, राजस्थान आणि मुंबई १० गुणांसह अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. यापैकी पंजाब संघाच्या प्ले-ऑफमध्ये दाखल होण्याच्या आशा आता संपुष्टात आल्या आहेत. दुसरीकडे गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं पारडं चौथ्या स्थानासाठी जड मानलं जातंय. परंतू -०.४५ हा रनरेट मुंबई इंडियन्सला धोकादायक ठरु शकतो. मुंबईचे उर्वरित दोन सामने राजस्थान आणि हैदराबादविरुद्ध रंगणार आहेत.

कोणत्या संघाला आहे चौथं स्थान मिळवण्याची संधी आणि काय आहेत निकष?

कोलकाता नाईट रायडर्स – मॉर्गनच्या संघाचा एकच सामना बाकी राहिला असून त्यांना या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवणं अनिवार्य आहे.

राजस्थान रॉयल्स – या संघाचे दोन सामने शिल्लक असून त्यांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी कोलकाता आणि मुंबई या दोन्ही संघांना हरवावं लागणार आहे.

मुंबई इंडियन्स – राजस्थान आणि हैदराबाद या दोन्ही सामन्यांत विजय मिळवणं अत्यंत गरजेचं. तसेच राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सला हरवल्यास मुंबईचा रस्ता आणखी सूकर होऊ शकतो.

पंजाब किंग्ज – पंजाबने अखेरच्या सामन्यात चेन्नईवर मात केली तर त्यांचे १२ गुण होऊ शकतात परंतू -०.२४ या रनरेटच्या आधारावर ते प्ले-ऑफमध्ये दाखल होऊ शकणार नाहीत.

याव्यतिरीक्त जर कोलकाता नाईट रायडर्स आपल्या अखेरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून हरलं, मुंबई इंडियन्सने राजस्थानवर मात करुन हैदराबादचा सामना गमावला आणि पंजाबने अखेरच्या सामन्यात चेन्नईवर मात केली तर कोलकाता नाईट रायडर्सला १२ गुण आणि नेट रनरेटच्या जोरावर प्ले-ऑफमध्ये स्थान मिळेल.

    follow whatsapp