Video : Rohit sharma ने मैदानातच सरफराझला झापलं,' 'ए भाऊ, हिरो नाही बनायचं इथं''

मुंबई तक

• 07:16 PM • 25 Feb 2024

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातच रोहित शर्माने मैदानावर सरफराजला जपलं आहे.

sarfaraz khan

sarfaraz khan

follow google news

India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात असलेला चौथा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आहे.  तिसऱ्या दिवसाचा सामना संपला असून भारताला आता विजयासाठी 152 धावांची गरज आहे. तर इंग्लंडला (England) विजयासाठी 10 विकेट्सची गरज आहे. या सामन्यातील एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचीच चर्चा सध्या जोरदार सुरु आहे.

हे वाचलं का?

भारताने चौथ्या दिवशी 152 धावा केल्या तर 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी आघाडी घेण्यात येईल आणि मालिकाही जिंकेल. आता या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान एक घटना घडली, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या डावात सरफराज खान फिल्डिंगसाठी आला. त्याला फलंदाजाच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षण करायचे होते आणि यावेळी त्याने हेल्मेटही घातले नव्हते. 

त्याचवेळी कॅप्टन रोहित शर्माने सरफराज खानला सांगितले की,  'ए भाई हिरो नहीं बनने का इधर'.  त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रोहितचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नसला तरी या मॅचमध्ये कमेंटेटरकडून त्याला पुन्हा सांगण्यात येतय की, 'भाई हिरो नहीं बनने का इधर. त्याने सांगितल्यानंतर सरफराज खाननेही हेल्मेट घातले आणि त्यानंतर त्याने फिल्डिंग केली. 

हे ही वाचा >> Lok sabha 2024 : बारामतीत सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवारच?


 या सामन्यात इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात त्यांनी 353 धावा केल्या होत्या. तर भारताने पहिल्या डावात 307 धावा केल्या आणि भारत 46 धावांनी मागे राहिला. दुसऱ्या डावात टीम इंडियाने इंग्लंडची अवस्था एकदमच बिकट झाली आणि अश्विनच्या 5 विकेट्स आणि कुलदीप यादवच्या 4 विकेट्सच्या जोरावर टीमला 145 धावांपर्यंत मजल मारता आली.

 रवींद्र जडेजालाही दुसऱ्या डावात यश मिळाले आणि टीम इंडियाच्या फिरकीपटूने इंग्लंडच्या 10 विकेटही घेतल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 40 धावा केल्या होत्या. यावेळी रोहित शर्मा 24 तर यशस्वी जैस्वाल 16 धावांसह खेळत आहे.

    follow whatsapp