नीरज चोप्राची सोनेरी कामगिरी! फिनलँडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनला हरवत जिंकलं सुवर्ण पदक

टोकियो ऑलिम्पिकममध्ये भाला फेक या खेळात सुवर्ण पदक जिंकून भारताची मान उंचावणाऱ्या नीरज चोप्राने फिनलँडमध्येही सोनेरी कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकनंतर झालेल्या या स्पर्धेत त्याने पुन्हा एकदा सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे. फिनलँड येथील कुओर्ताने स्पर्धेत त्याने त्याचा शानदार फॉर्म कायम राखला आहे. नीरज चोप्राने ८६.८९ मीटर लांब भाला फेकत गोल्ड मेडल जिंकलं आहे. नीरजच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:31 AM • 19 Jun 2022

follow google news

टोकियो ऑलिम्पिकममध्ये भाला फेक या खेळात सुवर्ण पदक जिंकून भारताची मान उंचावणाऱ्या नीरज चोप्राने फिनलँडमध्येही सोनेरी कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकनंतर झालेल्या या स्पर्धेत त्याने पुन्हा एकदा सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे. फिनलँड येथील कुओर्ताने स्पर्धेत त्याने त्याचा शानदार फॉर्म कायम राखला आहे.

हे वाचलं का?

नीरज चोप्राने ८६.८९ मीटर लांब भाला फेकत गोल्ड मेडल जिंकलं आहे. नीरजच्या फॅन्सना हे वाटत होतं की तो यावेळी ९० मीटरचा मार्क पार करेल, मात्र तसं झालं नसलं तरीही सुवर्ण पदकावर नीरजने त्याचं नाव कोरलं आहे.

‘मला पुढे करुन तुमचा घाणेरडा अजेंडा रेटू नका’, नीरज चोप्रा संतापला!

नीरज चोप्राने मागच्या आठवड्यात तुर्कूमध्ये ८९.३० मीटरपर्यंत भाला फेक करत पावो नुरमी स्पर्धेत रजत पदक पटाकवलं होतं. ९० मीटरचा मार्क अवघ्या ७० सेंटीमीटरने मागे राहिला होता. त्यावेळी फिनलँडच्या ऑलिव्हर हेलांडरने ८९.८३ मीटरचा थ्रो करत सुवर्ण पदक जिंकलं होतं.

नीरजने मात्र पहिल्याच प्रयत्नात ८६.८९ मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे. नीरज चोप्रासोबत स्पर्धेत असलेल्या इतर खेळाडूंना त्या अंतराला पार करता आलं नाही.

Neeraj Chopra: नीरज चोप्रानं स्वत:चाच रेकॉर्ड तोडला पण मिळाले ‘रौप्य पदक’; स्पर्धेदरम्यान काय झालं?

नंतरच्या वेळी नीरज चोप्रानं पुढील दोन प्रयत्न फाऊल केले. कारण, दुसऱ्यांदा फेकलेला भाला कमी अंतरावर पडल्यास नुकसान होण्याची शक्यता होती. दरम्यान नीरज चोप्रा जखमी देखील झाला होता. भालाफेक करताना नीरजचा पाय घसरला होता. मात्र, त्यानं हार मानली नाही.

नीरज चोप्रानं गेल्या वर्षी टोकिओ ऑलम्पिकमध्ये भारताला भालाफेक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. नीरज चोप्राच्या या कामगिरीनिमित्त देशभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षावर करण्यात आला होता. नीरज चोप्रानं फिनलँडमधील स्पर्धेत मिळवलेल्या यशावरुन त्यानं सातत्यानं यशस्वी कामगिरी करण्याकडे लक्ष दिल्याचं दिसून येतं.

टोकियो ऑलिम्पिकनंतर नीरजची ही दुसरीच स्पर्धा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. या आठवड्याच्या सुरुवातीला, त्याने पावो नुर्मी गेम्समध्ये ८९.३० मीटर थ्रो करून रौप्य पदक जिंकले आणि त्याचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज आता ३० जून रोजी डायमंड लीगच्या स्टॉकहोम लीगमध्ये भाग घेणार आहे. नीरज चोप्राच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

    follow whatsapp