पहिला दिवस साहेबांचा, विराटसेना बॅकफूटवर

भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पहिल्या टेस्ट मॅचला चेन्नईत सुरुवात झाली आहे. सिबले आणि रोरी बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी आश्वासक इनिंग खेळत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. टीम इंग्लंडच्या ओपनिंग पार्टनरशीपमुळे भारतीय टीम बॅकफूटला ढकलली गेली. रविचंद्रन आश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी एक-एक विकेट घेत इंग्लंडला धक्का दिला. मात्र यानंतर इंग्लंडच्या टीमने भारताला पूर्णपणे बॅकफूटला […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:28 PM • 05 Feb 2021

follow google news

हे वाचलं का?

भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पहिल्या टेस्ट मॅचला चेन्नईत सुरुवात झाली आहे.

सिबले आणि रोरी बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी आश्वासक इनिंग खेळत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली.

टीम इंग्लंडच्या ओपनिंग पार्टनरशीपमुळे भारतीय टीम बॅकफूटला ढकलली गेली.

रविचंद्रन आश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी एक-एक विकेट घेत इंग्लंडला धक्का दिला.

मात्र यानंतर इंग्लंडच्या टीमने भारताला पूर्णपणे बॅकफूटला ढकललं. जो रुट आणि डोम सिबले यांनी टीम इंडियाच्या बॉलर्सच्या नाकीनऊ आणले.

जो रुटने अखेरपर्यंत किल्ला लढवत आपल्या शंभराव्या टेस्ट मॅचमध्ये सेंच्युरी झळकावली. पहिल्या दिवसाअखेरीस इंग्लंडले २६३ पर्यंत मजल मारण्यात यश मिळवलं. अखेरच्या ओव्हर्समध्ये बुमराहने डोम सिबलेला ८७ रन्सवर आऊट करत संघाला तिसरं यश मिळवून दिलं.

    follow whatsapp