गुरू ग्रह मिथून राशीत एकत्र आल्याने १२ वर्षानंतर दुर्मिळ योगायोग घडणार, 'या' राशीतील लोकांच्या खिशात पैसा वाजणार
Astrology : गुरू ग्रह हा मिथून राशीत एकत्र आल्याने १२ वर्षानंतर दुर्मिळ योगायोग घडणार आहे आणि त्याचा परिणाम हा तीन राशींवर होईल, त्याची एकूण माहिती ही पुढील प्रमाणे :
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचर आणि युतीला विषेश महत्त्व आहे. आता तब्बल 12 वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग घडणार आहे. गुरू ग्रह हा मिथून राशीत एकत्रितपणे असतील. या युतीमुळे अनेक राशींमध्ये मोठे बदल होतील, परंतु इतर कोणत्या तीन विशेष राशी आहे ज्याचं नशीब फळफळेल ते जाणून घेऊयात.

2/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा आदर, आत्मविश्वास आणि सरकारी नोकरीचा कारक मानला जातो. तर गुरू हा ज्ञान, समृद्धी आणि आनंदाचा कारक मानला जातो. या दोन ग्रहांच्या मिलनामुळे काही राशींच्या उत्पन्नात आणि करिअरमध्ये चांगली वाढ होऊन आनंदाची बातमी मिळेल.

3/5
मीन राशी
मीन राशीतील लोकांना सूर्य आणि गुरुच्या युतीचा चांगला फायदा होईल. ही युती तुमच्या राशीच्या चौथ्या घरात तयार होत आहे. याचा फायदा मीन राशीतील लोकांना होणार आहे. कारण या राशीतील लोकांच्या कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेमाचं वातावरण राहील. तसेच आर्थिक लाभ मिळण्याची अधिक शक्यता राहणार आहे.

4/5
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरुची युती वरदानाहून कमी नाही. ही युती तुमच्या राशीपासून कर्मस्थानाच्या दहाव्या घरात तयार होत आहे. आपल्याला कामात मोठं यश मिळण्याची संधी आहे. तुमचा दर्जा वाढण्याची शक्यता आहे.

5/5
सिंह राशी
सिंह राशीतील लोकांच्या उत्पन्नात ही युती विशेषत: फायदेशीर ठरेल. सूर्य आणि गुरुची ही युती तुमच्या राशीच्या 11 व्या घरात आहे. या काळात आपल्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची चिन्हे आहेत. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची चिन्हे आहेत.