Astro Tips: रस्त्यावर पडलेली नोट किंवा नाणी उचलावी का... शुभ असतं की अशुभ?
Good Luck Tips: जर तुम्हाला कधी रस्त्यावर पडलेली नोट किंवा नाणे आढळले तर तुमच्या मनात प्रश्न येतो की ते उचलायचे की सोडून द्यायचे. पण हे जाणून घ्या की, ते पैसे तुमच्यासाठी शुभ असतील की अशुभ?
ADVERTISEMENT

Good Luck Tips for Money: अनेकदा आपल्याला रस्त्यावर नोटा किंवा नाणी पडलेली आढळतात. आपल्या मनात प्रश्न येतो की, ते उचलावे की सोडून द्यावे. काही लोकं म्हणतात की जर देवी लक्ष्मी तुमच्या समोर पडली असेल तर तिचा अपमान करू नये. मनात असाही प्रश्न येतो की, ते दुसऱ्या कोणाचे आहे आणि ती व्यक्ती देखील ते शोधत असेल.
रिमा (काल्पनिक नाव) सोबतही असेच काहीसे घडले. रिमा ऑफिसमधून बाहेर पडून काही पावलं पुढे आली तोच तिला मंद प्रकाशात एक 100 रुपयांची नोट पडलेली दिसली. ती तिथेच थांबली. तिच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न येऊ लागले. शेवटी, तिने ते पैसे उचलले. पण त्या पैशाभोवती फिरणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे तिला सापडली नाहीत, जसे की आता या पैशाचे काय करावे.
हे ही वाचा>> काच फुटणं शुभ की अशुभ? खरं काय ते समजल्यावर तुम्हालाही...
आज, लोकांच्या जीवनाशी आणि श्रद्धांशी संबंधित या सीरिजमध्ये, आम्ही सुप्रसिद्ध ज्योतिषी प्रीतिका मजुमदार या संदर्भात प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. प्रीतिका म्हणते की, जर तुम्हाला कधी रस्त्यावर पडलेली नोट किंवा नाणे आढळले तर तो केवळ योगायोग समजू नका. हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण असू शकते. ज्योतिष आणि आध्यात्मिक श्रद्धांनुसार, हे पूर्वजांकडून मिळालेला आशीर्वाद किंवा काही दैवी शक्ती असू शकते.
नाणी मिळण्याचे नेमके संकेत काय?
जर तुम्हाला रस्त्यावर नाणे पडलेले दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. असे मानले जाते की, हे तुमच्या पूर्वजांकडून किंवा दैवी शक्तींकडून संदेश असू शकते की ते तुमची काळजी घेत आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहेत.










