नोव्हेंबर महिन्यापासून लगीन सराई सुरु होणार, यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी डिसेंबरमध्ये केवळ तीन मुहूर्त?
Vivah Muhurat 2025 : नोव्हेंबर महिन्यापासून लगीन सराई सुरु, यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी डिसेंबरमध्ये केवळ तीन मुहूर्त? सविस्तर माहिती जाणून घ्या..एका क्लिकवर
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नोव्हेंबर महिन्यापासून लगीन सराई सुरु
यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी डिसेंबरमध्ये केवळ तीन मुहूर्त?
Vivah Muhurat 2025 : हिंदू धर्मात विवाहसंस्काराला अत्यंत पवित्र आणि महत्वाचे स्थान आहे. विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन कुटुंबांचं आणि दोन जीवांचं पवित्र बंधन. प्रत्येकाला इच्छा असते की, देव-देवतांच्या साक्षीने, मंत्रोच्चारांच्या मंगल स्वरात आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत आपला विवाह संपन्न व्हावा. कोणताही शुभ कार्य करताना पंचांगाचा आणि मुहूर्ताचा विचार केला जातो, आणि विवाहासाठी तर शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व असते.
आता चातुर्मास संपल्याने पुन्हा शुभ कार्यांना सुरुवात होणार आहे. रविवार, 2 नोव्हेंबर 2025 रोजी तुळशी विवाहानंतर देवऊठनी एकादशी येत आहे, आणि यानंतर विवाह, मुंज, गृहप्रवेश, यांसारख्या मंगल कार्यांना प्रारंभ होईल.
देवऊठनी एकादशीनंतर शुभ कार्यांना प्रारंभ
धार्मिक परंपरेनुसार, देवशयनी एकादशीपासून (6 जुलै) भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेत जातात. या काळात म्हणजेच चातुर्मासात विवाह व इतर शुभ कार्ये टाळली जातात. परंतु देवऊठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि तेव्हापासून सर्व शुभ कार्यांना परवानगी मिळते. त्यामुळे नोव्हेंबरपासून लगीनसराईचा हंगाम सुरु होणार आहे.
हेही वाचा : 'चल खोलीत...', तरूणी म्हणाली 'येत नाही..' चिडलेल्या बॉयफ्रेंडने केली भलतीच गोष्ट!










