ATM पासून ते रेल्वेच्या तिकीटांपर्यंत... आजपासून बदलणार 'या' गोष्टी
May Rule Changes: मे महिन्याच्या सुरूवातीलाच देशातील योजनांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. एटीएम मधून पैसे काढण्यापासून ते रेल्वेचं तिकीट बुक करण्यापर्यंत, बऱ्याच नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
1 मे पासून देशातील योजनांच्या नियमांमध्ये बदल
कोणत्या योजनांमध्ये बदल करण्यात आले आहेत?
1 मे पासून कोणत्या नियमांमध्ये बदल झाले?
Rule Changes in May: आज 1 मे पासून, देशात बरेच मोठे बदल लागू करण्यात आले आहेत. या सगळ्या बदलांचा सामान्य माणसाच्या खिशावर आणि त्याच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम होणार असल्याचं पाहायला मिळतंय. एटीएम मधून पैसे काढण्यापासून ते रेल्वेचं तिकीट बुक करण्यापर्यंत, बऱ्याच नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
एटीएम मधून पैसे काढणं महागलं
1 मे 2025 पासून एटीएम मधून पैसे काढणं महाग झालं आहे. भारतीय रिजर्व्ह बॅंक (RBI) ने एटीएमचे चार्ज वाढण्याची परवानगी दिली आहे. जर तुम्ही तुमच्या बॅंकेच्या एटीएम ऐवजी कोणत्या दुसऱ्या बॅंकेच्या एटीएम मधून पैसे काढत असाल, तर तुम्हाला प्रत्येक ट्रांझॅक्शनच्या मागे 17 रुपयांऐवजी 19 रुपये द्यावे लागणार आहेत. याव्यतिरिक्त, दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून बॅलेन्स चेक केल्यानंतर 6 रुपये शुल्काऐवजी आता 7 रुपये आकारण्यात येणार आहेत. बऱ्याच बँकांनी आपल्या वेबसाइटवर मोफत ट्रांझेक्शन सुविधेच्या सीमेवर लागणाऱ्या शुल्कासंबंधिची सुद्धा माहिती दिली आहे. काही बँकेमध्ये हे शुल्क 23 रुपयांपर्यंत आहे.
रेल्वे तिकीट बुकींच्या नियमांमधील बदल
भारतीय रेल्वेने 1 मे पासून तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता फक्त जनरल कोचमध्येच वेटिंग तिकीट मान्य होणार आहे. याचा अर्थ, तुम्ही वेटिंग लिस्टमधील तिकीटाच्या आधारे स्लीपर कोचमधून प्रवास करू शकणार नाही. यासोबतच, 120 दिवसांचा अॅडवान्स्ड रिझर्वेशनचा कालावधी आता फक्त 60 दिवसच करण्यात आला आहे.










