Personal Finance: मुलीच्या लग्नासाठी मिळतील 27 लाख रुपये, LIC चा हा प्लॅन पाहिला का, फक्त 121 रुपयात!

मुंबई तक

भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने मुलींसाठी एक उत्तम योजना आणली आहे. ही अशी योजना आहे ज्यामध्ये लहान बचत करूनही मुलीच्या लग्नासाठी मोठा निधी निर्माण करता येतो. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Personal Finance
Personal Finance
social share
google news

बातम्या हायलाइट

point

LIC ची मुलींसाठी नवीन योजना

point

मुलीच्या लग्नापर्यंत मिळवा 27 लाख रुपयांचा निधी

point

दररोज छोटी बचत करुन मुलीच्या लग्नासाठी लाखोंचा निधी मिळवा

LIC Scheme: भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने मुलींसाठी एक उत्तम योजना आणली आहे. खरंतर ही योजना मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता दूर करू शकते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'एलआयसी कन्यादान पॉलिसी'  ही अशी योजना आहे ज्यामध्ये लहान बचत करूनही मुलीच्या लग्नासाठी मोठा निधी निर्माण करता येतो. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

दररोज 121 रुपये बचत करून 27 लाखांचा निधी मिळवा

LIC कन्यादान योजना मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यास तसेच त्यांच्या लग्नासाठी पुरेसा निधी उभारण्यास मदत करते. या योजनेअंतर्गत, तुम्हाला तुमच्या मुलीसाठी दररोज फक्त 121 रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच एका महिन्यात एकूण 3600 रुपये. अशाप्रकारे, नियमितपणे गुंतवणूक करून 25 वर्षे  (पॉलिसी मॅच्युरिटी कालावधी)  पूर्ण झाल्यावर तुम्हाला 27 लाखांपेक्षा जास्त निधी एकरकमी मिळेल.

आवश्यकतेनुसार मॅच्युरिटी कालावधी निवडा

एलआयसीची ही उत्कृष्ट पॉलिसी 13 ते 25 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी घेता येते. उदाहरणार्थ, जर तुमची मुलगी दोन वर्षांची असेल आणि तुम्ही 25 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह 10 लाखांचा प्लॅन घेतला आणि दररोज 121 रुपये जमा केली, तर तुमची मुलगी 27 वर्षांची झाल्यावर तिला 27 लाख रुपये मिळतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुंतवणूक रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता आणि त्यानुसार तुमचा फंड बदलेल.

कर सवलत देखील असेल

मुलींसाठी बनवलेल्या या LIC योजनेचा लाभ घेण्यासाठी वडिलांचे किमान वय 30 वर्षे आणि मुलीचे वय किमान एक वर्ष असावे. या पॉलिसीमध्ये मोठ्या निधी जमा होण्यासोबतच कर लाभ देखील उपलब्ध आहेत. एलआयसी कन्यादान पॉलिसी ही आयकर कायदा 1961 च्या कलम 80 C अंतर्गत येते. याअंतर्गत प्रीमियम भरणाऱ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते.

हे वाचलं का?

    follow whatsapp