Personal Finance: तुमचे पैसे किती दिवसात दुप्पट होतील? 'Rule of 72' तुम्हाला नेमकं सांगेल!
Money Doubling Formula 72 Rule: हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो की त्याचे पैसे दुप्पट कसे होतील. कोणत्याही गुंतवणुकीत पैसे गुंतवल्यानंतर आपण हाच विचार करतो. येथे आम्ही गुंतवणूकदारांसाठी 3 फॉर्म्युले सांगत आहोत.
ADVERTISEMENT

'माझे पैसे कधी दुप्पट होतील?' हा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात असतो. गुंतवणूक करून पैसे दुप्पट आणि तिप्पट करण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. लोक अशा गुंतवणुकीत पैसे गुंतवतात ज्यामध्ये असा दावा केला जातो की पैसे थोड्याच वेळात दुप्पट होतील. (How to double money using 72 rule) प्रश्न असा आहे की, त्या काळात तुमचे पैसे खरोखर दुप्पट होतील का? हे तपासण्यासाठी तुम्ही एक सूत्र वापरू शकता. हा 72 चा नियम आहे. (Rule of 72).
अक्षयने आपले पैसे एका योजनेत गुंतवले आहेत ज्यामध्ये पैसे दुप्पट होतील असा दावा केला जात आहे. अक्षयला हे देखील जाणून घ्यायचे आहे की त्याचे पैसे कधी तिप्पट किंवा चौपट होतील. पर्सनल फायनान्सच्या (Personal Finance)या सीरिजमध्ये, आपण अक्षयला तीन फॉर्म्युले सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला 72 च्या नियमाची संपूर्ण माहिती सांगत आहोत (What is Rule of 72). ते कसे वापरावे, त्याची अचूकता काय आहे? यासोबतच आम्ही तुम्हाला 114 आणि 144 चे नियम देखील सांगत आहोत. हा नियम काय आहे आणि तो कसा काम करतो ते सोप्या भाषेत समजून घेऊया...
72 चा नियम काय आहे?
72 चा नियम हा एक साधा गणितीय सूत्र आहे जो सांगतो की जर तुम्हाला विशिष्ट दराने परतावा मिळत असेल तर कोणतीही रक्कम दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील.
फॉर्म्युला
72 ÷ व्याजदर (परतावा %) = वर्षे (ज्या काळात पैसे दुप्पट होतील)









