2000 note banned : स्वातंत्र्याआधी झाली होती पहिली नोटबंदी; असा आहे इतिहास
रिझर्व्ह बँकेने 2000 हजाराची नोट व्यवहारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाकडे नोटबंदी म्हणून बघितलं जात आहे. देशात आतापर्यंत कितीवेळा नोटबंदी झाली, तेच पाहुयात…
ADVERTISEMENT

भारतीयांना 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख चांगलीच आठवत असेल. पण, आता 19 मे 2023 ही तारीखही लक्षात राहील. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनातून सर्वात मोठी 2000 ची नोट काढून घेण्याची घोषणा केली आहे. असं असलं तरी ती लीगल टेंडरमध्ये कायम असणार आहे म्हणजेच व्यवहारातून बाद होणार नाहीये.
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जाऊन 2000 च्या नोटा बदलता येतील. एकावेळी नोटा बदलण्याची मर्यादा 20,000 रुपये आहे.
रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी करून बँकांना ग्राहकांना 2000 च्या नोटा न देण्याचा सल्ला दिला आहे. तुमच्याकडेही 2000 च्या नोटा असतील तर तुम्ही त्या तुमच्या खात्यात जमा करू शकता किंवा बँकेच्या शाखेत जाऊन बदलू शकता.
नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर 2000 च्या नोटा जारी करण्यात आल्या. मात्र तीन वर्षांपासून 2000 च्या नोटांची छपाई होत नव्हती. त्यामुळे त्याचे व्यवहारातील प्रमाण कमी झाले.