Sindhudurga: मालवण हादरलं, तारकर्ली समुद्रात 20 पर्यटकांसह बोट बुडाली, दोघांचा मृत्यू

मुंबई तक

सिंधुदुर्ग: मालवणनजीक तारकर्ली समुद्रात स्कुबा डायव्हिंगहून परतत असणारी एक बोट अचानक समुद्रात बुडाली. या बोटीत 20 हून अधिक पर्यटक होते. ज्यापैकी दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला असून एका पर्यटकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. तर 16 जणांना वाचविण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. नेमकी घटना काय? मालवणच्या तारकर्ली समुद्रात एक बोट वीस पर्यटकांना घेऊन स्कुबा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सिंधुदुर्ग: मालवणनजीक तारकर्ली समुद्रात स्कुबा डायव्हिंगहून परतत असणारी एक बोट अचानक समुद्रात बुडाली. या बोटीत 20 हून अधिक पर्यटक होते. ज्यापैकी दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला असून एका पर्यटकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. तर 16 जणांना वाचविण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

नेमकी घटना काय?

मालवणच्या तारकर्ली समुद्रात एक बोट वीस पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. स्कुबा डायव्हिंग करुन बोट परतत असतानाच किनाऱ्यापासून काही मीटर अंतरावर अचानक ही बोट बुडाली. ज्यामधील 20 पर्यटकही समुद्रात बुडाले. यापैकी दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून दोन पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे.

मे महिना सुरु असल्याने सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. पर्यटकांची मोठी पसंती ही मालवणसह तारकर्लीला असते. तारकर्ली हे पर्यटनाचे माहेरघर मानले जाते. पुणे आणि मुंबईतुन एक ग्रुप पर्यटनासाठी तारकर्लीमध्ये आला होता. हे सगळेच 20 जण पर्यटक स्कुबा डायव्हिंगसाठी समुद्रात गेले होते. स्कुबा डायव्हिंग आटपून हे पर्यटक तारकर्ली समुद्र किनाऱ्याच्या दिशेने परतत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp