Palghar: रस्त्याअभावी गर्भवतीला घेऊन 3 किलोमीटर पायी प्रवास; जुळ्या बाळांचा मृत्यू, तर…
मोहम्मद हुसेन खान, प्रतिनिधी, पालघर पालघर: एका बाजूला देशात आझादी का अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र ग्रामीण भागात आजही मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला पाहायला मिळत आहे. गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने वंदना बुधर या प्रसूती झालेल्या महिलेला मरण यातना सहन कराव्या लागल्या आहेत. मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडी येथील गरोदर माता वंदना बुधर यांनी […]
ADVERTISEMENT

मोहम्मद हुसेन खान, प्रतिनिधी, पालघर
पालघर: एका बाजूला देशात आझादी का अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र ग्रामीण भागात आजही मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला पाहायला मिळत आहे. गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने वंदना बुधर या प्रसूती झालेल्या महिलेला मरण यातना सहन कराव्या लागल्या आहेत. मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडी येथील गरोदर माता वंदना बुधर यांनी 2 जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र दुर्दैवाने दोन्ही मुलं दगावली आहेत. वंदनाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. 108 ला कॉल केला मात्र गावाला जोडणारा रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावात पोहचू शकली नाही. पालघर जिल्ह्यात ही घटना घडली.
डोलीत घेऊन तब्बल 3 किलोमीटरा पायी प्रवास
पालघर जिल्ह्यातील मोखाडा पासून बोटोशी गावात वंदनाच्या कुटुंबीयांनी डोलीचा आधार घेऊन वंदना यांना रुग्णालयात दाखल केलं. मुख्यरस्ता गाठण्यासाठी वंदना यांना डोलीत घेऊन कुटुंबियांना 3 किलोमीटरची पायपीट करावी लागली. त्यातही पायवाट जीवघेणी असल्याने वंदना यांच्या कुटुंबियांना मोठी कसरत करावी लागली. हा व्हिडीओ सध्या समोर आला असून ग्रामीण भागातील दाहक वास्तव पुन्हा एकदा उघड झालं आहे.
मोखाडा पासून 30 ते 35 किमी अंतरावर दरी डोंगरात वसलेल्या बोटोशी ग्रामपंचायतीमध्ये 50 घरं असलेल्या 226 लोकवस्ती, अंगणवाडी, इयत्ता 5 वी पर्यंत शाळा असलेल्या मर्कटवाडी व बोटोशी येथील 105 घरे व 1 हजार 400 लोकसंख्येच्या गावात आदिवासींना रस्त्या अभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. या गावात यापूर्वीही रूग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. दरम्यान 2 ऑगस्ट रोजी नवनिर्वाचित जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या गावाची पाहणी केली होती, त्यांनी या गावात तातडीने रस्ता मंजूर करण्याचे आदेश दिलेले आहेत.