Mulund: ‘गुजराती माणसाने मराठी म्हणून जागा नाकारली’, महिलेला धक्काबुक्की; अजित पवार प्रचंड संतापले

प्रशांत गोमाणे

ठाण्याच्या मुलुंड भागात एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलुंडच्या शिवसदन सोसायटीत ही घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

ajit pawar reaction on rejected for office because of being marathi mulund story
ajit pawar reaction on rejected for office because of being marathi mulund story
social share
google news

Ajit Pawar Reaction mulund marathi Incident : मुलुंड भागात एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलुंडच्या शिवसदन सोसायटीत ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे मराठी महिलेला जागाच नाकारली नाही तर तिला धक्काबुक्की करण्यात आली आहे आणि तिच्या पतीला देखील मारहाण झाल्याचा आऱोप महिलेने केला आहे.या प्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली असून, मराठी माणसाचा अपमान करण्याचे धाडस पुन्हा होणार नाही, अशी भूमिका अजित दादांनी मांडली आहे. (ajit pawar reaction on rejected for office because of being marathi mulund story)

नेमकं प्रकरण काय?

मुंबईत राहणाऱ्या तृप्ती देवरूखकर या महिला तिच्या नवऱ्यासोबत ऑफिससाठी जागा पाहण्यासाठी मुलुंड परिसरात गेल्या होत्या. तृप्ती या मुलुंडच्या शिवसदन सोसायटीत गेल्या होत्या. यावेळी शिवसदन सोसायटीचे सेक्रेटरी प्रविण ठक्कर यांनी त्यांना सोसायटीत महाराष्ट्रीयन अलाऊड नसल्याचे उत्तर दिले होते. या संबंधित सोसाटीची नियमावलीची कॉपी तृप्ती यांनी मागितली असता सेक्रेटरीने त्यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरूवात केली. तृप्तीसोबत त्यांचा नवरा आणि सोसाटीच्या सेक्रेटरीमध्ये यावरून मोठा वाद देखील झाला.

हे ही वाचा: Ajit Pawar: दादा मुख्यमंत्री? मोहित कंबोज यांचे बोचणारे 8 शब्द, Tweet का केलं डिलीट?

या घटनेनंतर तृप्ती देवरूखकर यांनी फेसबूकवर संपूर्ण घटनाक्रम सांगितला. महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणस अलाऊड नाही आहेत. इतकी मुजोरी, इतका माज कुठून आला? महाराष्ट्रात राहून मराठी माणसांनाच सांगतात, तुम्हाला इथे राहण्याची परवानगी नाही आहे. मग काय गुजरातमध्ये राहायचं का, असा संतप्त सवाल तृप्ती देवरूखकर यांनी यावेळी केला. त्याचसोबत सोसायटीचा सेक्रेटरी माझ्या अंगावर आला, माझ्या नवऱ्याला मारहाण केली,त्यांचा चष्मा देखील तोडला असा गंभीर आरोप तृप्ती देवरूखकर यांनी केला आहे.

गणपतीत तुम्हाला रायगडचा देखावा करायचा असतो, मावळेपण मिरवायचे असते. पण हे खूप भयानक आहे. तुमच्या मनसैनिक आणि शिवसैनिक म्हणण्यात अर्थ नाही, अशी टीका त्यांनी राजकीय पक्षांवर केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp