NCB :समीर वानखेडे अडकणार?; आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लिन चिट मिळताच केंद्राने दिले निर्देश
कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला क्लिन चिट मिळाली आहे. यामुळे एनसीबीचे तत्कालिन संचालक समीर वानखेडे मात्र अडचणीत आले आहेत. एनसीबीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, केंद्राने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई एनसीबीच्या पथकाने मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी ड्रग्ज पार्टी करत […]
ADVERTISEMENT

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला क्लिन चिट मिळाली आहे. यामुळे एनसीबीचे तत्कालिन संचालक समीर वानखेडे मात्र अडचणीत आले आहेत. एनसीबीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, केंद्राने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
२ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई एनसीबीच्या पथकाने मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी ड्रग्ज पार्टी करत असल्याचा दावा करत एनसीबीने काही जणांना ताब्यात घेऊन नंतर अटक केली होती. यात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता.
दरम्यान, एनसीबीने या प्रकरणात ६ हजार पानांचं आरोपपत्र एनपीडीएस न्यायालयात सादर केलं. या आरोपपत्रात आर्यन खानसह जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचं एनसीबीनं म्हटलं आहे. पुरेसे पुरावे नसल्यानं गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत, असं एनसीबीने स्पष्ट केलं आहे.
आर्यन खानला एनसीबीकडून क्लिन चिट मिळाल्यानं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मुंबईपासून दिल्लीपर्यंत या प्रकरणाची चर्चा सूरु झाली असून, तत्कालिन एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.